मूल : समग्र शिक्षा समवेशीत शिक्षण अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती मूलच्या वतीने गटशिक्षणाघिकारी वैभव खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिव्यांग विद्यार्थीच्या घरी गृहभेटी घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी दिव्यांगाविषयी समाजातील अंधश्रध्दा दूर करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासबंधाने मार्गदर्शन करण्यात आले. नवभारत कन्या विद्यालय मूल येथे विदयार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच फॅसी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गाणे, नृत्य आदी स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आल्या. विद्यार्थांमध्ये कुतुहल निर्माण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संतोष सोनवणे, समवेशीत शिक्षक विवेक डांगे, बंडू भेले, यशवंत शेट्टी, ईश्वर लोनबले, निलेश शेनमारे, स्वप्निल मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.