नितीन मुसळे/प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती /गोवरी : पूराची पुसटशी कल्पनाही गोवरीवासीयांना नव्हती. वसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावालगतच्या नाल्याला अचानक पूर आला. क्षणार्धात पुराचे पाणी पाहता पाहता घरात शिरले. आणि गोवरीवासीयांचा संसार पुराच्या पाण्याखाली आला. संसार सावरताना डोळ्यांतील अश्रू अंतर्मुख करणारे होते.राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गोवरी वसास्ती गावांसह इतर गावांना पुराचा धोका होण्याचे भाकीत महिनाभरापूर्वी वर्तविले होते. पुराचे पाणी गोवरी गावात शिरले आणि काही कळायच्या आत घरात शिरल्याने शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर आला. डोळ्यादेखत पुराचे पाणी घरात शिरत असल्याचे पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. घरातील अन्नधान्य, जीवन उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. राहत्या घरात पाच फुटांपर्यंत पाणी असल्याने अनेकांना कुटुंबातील साहित्य इतरत्र हलविण्याची दुर्दैवी वेळ आली. काही कुटुंबांनी चार पाच फूट पाण्यातून संसार पाण्याबाहेर काढत होते. डोळ्यादेखत संसार वाहून जात असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. शेकडो कुटुंब उघड्यावर आले. शुक्रवारी गोवरी येथील सरपंच आशा उरकुडे, शिवसेना नेते बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार व गावकऱ्यांना घेऊन तलाठी सुनील रामटेके यांनी पूरग्रस्त भागातील घरांचा मोका पंचनामा केला. यावेळी अनेक पूरग्रस्त गावकऱ्यांना पाण्यात वाहून गेलेला संसार पाहून अश्रू आवरता आले नाही.
पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावीगोवरी येथील शेकडो घरात पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर आले.गावात पुराने सर्वत्र पसरल्याने हाहाकार झाला. वेकोलीच्या दुष्परिणामांचा मोठा फटाका गावकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.