चंद्रपूर : जिल््हा क्षयरोग नियंत्रण विभाग जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने क्षयरोग जागृती रॅली जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यालयामधून निघाली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एस. पुल्लकवार तसेच जिल्हा पर्यवेक्षक किशोर माणुसमारे, एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर आदी उपस्थित होते. सदर रॅली जटपुरा गेट, जिल्हा परिषद जवळून पाण्याच्या टाकीपासून वळून दवा बाजार मार्गे जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यालयात पोहचली.सत्कार कार्यक्रमाला विहान प्रकल्पाचे संचालक फादर बेन्नी मुलक्कल उपस्थित होते. प्रकल्प समन्वयक जोसेफ दोमाला यांनी विहान प्रकल्पाचे उद्देश व कार्य े विषद केले. त्यानंतर या प्रकल्पाच्या माध्यमातून टिबी-एचआयव्ही समन्वय साधून आय.सी.एफ करणे आणि एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना क्षयरोग निदान व उपचार करण्याचे कार्य कसे पार पाडले जाते, याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर फादर बेन्नी मुलक्कल यांच्या हस्ते डॉ. संजय पुल्लकवार यांना क्षयरोग निदान व उपचार कार्यातील उत्कृष्ठ नेतृत्वाबद्दल सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यानंतर उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या खिरेंद्र पाझारे, अमोल जगताप, सुधा वर्मा, स्वाती चव्हाण, संगिता नकले, सचिन हस्ते, संजय मडपाचे, सचिन बर्डे, चंद्रशेखर पारधी, विपीन झाडे, स्वाती गोलपल्लीवार यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)जि.प. प्राथमिक शाळा सुमठाणा येथे निरोप समारंभघोडपेठ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुमठाणा येथे ७ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. सहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक भसारकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस्य देवराव बल्की उपस्थित होते. यावेळी वर्ग शिक्षक कमलाकर मेश्राम, वनिता बलकी, रजनी सोगे, गायत्री फाळके, मिना चिमूरकर उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रम
By admin | Published: April 02, 2017 12:42 AM