हा मोर्चा पेपरमिल काटा गेटपासून निघून तो नगरपरिषद भवनाजवळ आल्यानंतर पार्टीचे नेते ॲड. किशोर पुसलवार, रविकुमार पुपलवार, आसिफ हुसेन, नंदकिशोर सिन्हा यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना राज्य सरकार व ऊर्जामंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. कोरोना काळात लोकांचे रोजगार बुडाले असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक संकट उभे झाले आहे. त्याकरिता वीज बिलाबाबत सक्तीचे वसुली टाळावी. जबरदस्ती करू नये. कोरोना काळात चार महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी निवेदनातून सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी सुनील मुसळे, संतोष दोरखंडे, भिमराज सोनी, प्रशांत येरणे, आनंदे, समशेर सिंग, अशोक नायडू, सय्यद अफझल अली, कमलेश देवईकर, भगतसिंग आजाद, सुमित टाकसांडे, पवन पाल , पवन वैरागडे , सुरेश पुजलवार, उमेश काकडे, महेंद्र आकापाका, संजय पिदुरकर ,मनीष नागापुरे उपस्थित होते.
वीज बिलाच्या सक्ती विरोधात आपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:33 AM