राजुरा : जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारे स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांच्या पुढाकाराने युवा सशक्तीकरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या शिबिरात कम्युनिकेशन स्किल, करिअर ओरिएंटेशन, टाइम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, इमोशनल मॅनेजमेंट याविषयी झोन ट्रेनर संजय गुप्ता, शीतल पडगीलवार, निसार शेख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एस. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी राजुरा प्राइडचे संस्थापक अध्यक्ष गोपाल सारडा व संदीप खो उपस्थित होते. संचालन बुटले यांनी केले. आभार घोडेस्वार यांनी मानले. यावेळी रॉयल्सच्या अध्यक्ष स्मृती व्यवहारे, माजी अध्यक्ष सुषमा शुक्ला, जयश्री शेंडे, सुशीला पोरेड्डीवार, रेखा बोढे, मधुस्मिता पाढी, मनीषा पून, प्रफुल्ला धोपटे, डॉ. मोनिशा पाटणकर, ज्योती मेडपल्लीवार, मंजू गौतम यांची उपस्थिती होती. तीन दिवसीय शिबिरामध्ये विविध विषयांवर दिलेल्या मार्गदर्शनाचे उत्तम धडे विद्यार्थ्यांनी घेतले.