लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुणे, मूंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊन मिळेल ते काम करणारे तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय नोकरीचे स्वप्न बघणारे हजारे तरुण कोरोनाच्या दहशतीमुळे स्वगावी दाखल झाले आहे. आई-वडील शेतात राबताना बघून तेही या कामात गुंतल्याचे चित्र सध्या गावागावांत बघायला मिळत आहे.शेतीत काय पडले आहे, यापेक्षा महानगरात जास्त पैसा मिळतो, या विचाराने अनेक जण गाव सोडून पूणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात गेले होते. मात्र कोरोपनामुळे त्यांना गावाचा रस्ता धरावा लागला. शेतात काय पडले, असे म्हणणारे तेच तरुण मंडळी आता शेतात राबत आहे. आई-वडीलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करीत आहे.कोरोनामुळे सर्व ठप्प पडले आहे. हाताला काम नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती हा एकमेव पर्याय अनेकांसमोर आहे. ग्रामीण भागातील काही तरुण वर्ग पुणे, मुंबई येथे काम करत होते. तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय नोकरी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत होते.कोरोनामुळे सर्वांच्याच स्वप्नाचा चुराडा झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे जगणे अवघड झाल्याने तरुणांनी आपल्या गावाकडची वाट धरली असून अनेकांनी बैल घेऊन शेतात जाणे सुरू केले आहे. पूर्वी शेतात न दिसणारे शहरातील तरुण मंडळी आता शेताच्या बांधावर दिसत आहे.
अनेकांचे स्वप्न अपूर्णचस्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक तरुणांनी पूणे, दिल्ली गाठली. दिवसरात्र एक करून अभ्यास सुरू केला.अनेकवेळा उपाशी पोटी रात्रसुद्धा काढली. मात्र कोरोनाचे संकट आले आणि त्यांना आपल्या गावी परत यावे लागते. त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण होणार की, नाही या विवंचनेत ते सध्या सापडले आहे. विशेष म्हणजे, काहींनी अभ्यास सुरूच ठेवला आहे. तर काही जण शेतात राबत आपला एक एक दिवस काढत आहे.
रोजगाराच्या शोधात मी बंगरुळू येथे गेलो होतो. मात्र येथील सर्वच खासगी कंपन्या बंद झाल्याने मी स्वगावी परतलो असून मी माझ्या आई-वडिलांसोबत शेतीची कामे करीत आहे.- श्रीकांत मादणेलवारयुवक, गोवरी
नागपूर येथील एका खासगी कंपनीत मी काम करीत होतो. परंतु लॉकडाऊन झाल्याने सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या. हाताला काम नसल्याने स्वगावी परत आलो. मी आई-वडिलांसोबत शेतीची कामे करीत आहो.-रत्नपाल कुळमेथे, युवक, गोवरी