लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले.पटेल हायस्कूल अॅल्युमनी फाउंडेशन, प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट व यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रविवारी इंदिरा गांधी प्रियदर्शिनी सभागृहात ड्रग्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ. किशोर जोरगेवार, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. सतनाम सलुजा, डॉ. पालिवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. चंद्र्रपुरात ड्रग्स सेवन करणाऱ्या युवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक व युवतींचा सहभाग आहे. पोलीस प्रशासन जनजागृती करत असले तरी प्रभावी परिणाम झाला नाही, याकडे जोरगेवार यांनी लक्ष वेधले.समन्वयक म्हणून भोला मडावी, भालचंद्र हेमके, प्रकाश निब्रड यांनी भूमिका पार पाडली. यावेळी रवींद्र्र नंदनवार, विजय निरंजने, अमित कोवे, मशारकर, श्रीकांत झाडे, मंगेश चवरे, प्रशांत बुरांडे उपस्थित होते. प्रास्ताविक आश्विन मुसळे यांनी केले. रजनी बोडेकर यांनी आभार मानले.ड्रग्स सेवनाने होतो मेंदू निकामीडॉ. देशमुख यांनी ड्रग्स सेवन केल्याने शरीर व मेंदू निकामी होतो असे सांगून ड्रग्स घेण्याची कारणे, ड्रग्स लागण झाल्यानंतर शरिरावर होणाºया परिमाणींची माहिती दिली. डॉ. पालीवाल यांनी विद्यार्ध्यांशी संवाद साधला. अतिदुर्गम नक्षली भागात स्वत:चे जीव धोक्यात टाकून वर्षांपासून नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस जवानांवर मोफत उपचार करणाºया डॉ. सलुजा यांचा सत्कार करण्यात आला.
युवकांनो, ड्रग्सपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:16 PM
ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले.
ठळक मुद्देसमुपदेशकांचा सल्ला : जोरगेवार ट्रस्टतर्फे जागृती