शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:36 AM

जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत.

ठळक मुद्देशाळा प्रवेशोत्सवाचा नवीन प्रयोग : दुर्गम, आदिवासी भागातील शाळा वगळल्या

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत. मात्र, दुर्गम व आदिवासी भागातील बहुतांश शाळांना वगळण्यात आले आहे.मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा २००९ लागू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणातील गुणात्मक विकासासाठी नाविण्यपूर्ण संकल्पांचा जणू रतिब ओतल्या जात आहे. यातून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर काय परिणाम होत आहे, हा स्वतंत्र मूल्यमापनाचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत काही शिक्षक संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत असतात. शैक्षणिक आस्थेपोटी शासनाकडे विधायक सूचना केल्या जात असतील तर नाक मुरडण्याचे काही कारण नाही. परंत, काही शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रमातून अंग काढून घेण्यासाठी शिक्षक संघटनांचा ढाल म्हणून वापर करतात, असा पालकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदने २०१९-२० या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विशेष लक्ष देण्याचा संकल्प केला. हे ‘३६ अधिकारी ३६ शाळांना देणार भेटी’ या उपक्रमातून दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.जुन्या परंपरेला फाटायापूर्वी पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उरकून घेतल्या जात होता. जि. प. ने नवीन शैक्षणिक सत्रात या परंपरेला फाटा दिला. कोणते अधिकारी कोणत्या शाळांना भेटी देणार अशा ३६ अधिकाऱ्यांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी तयार केली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकाऱ्यांसह वर्ग-१ आणि २ संवर्गातील ३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मुख्याध्यापक देणार १३ प्रकारची माहितीशाळेच्या पहिल्या दिवशी अधिकाºयांनी भेट दिल्यानंतर मुख्याध्यापकांना शाळा प्रवेशोत्सव भेट प्रपत्रात १३ प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. गृहभेटी झाल्या काय, नियोजनाची एसएमसी सभा, गणवेश व पाठपुस्तके विद्यार्थ्यांना दिले काय, वृक्षारोपणाच्या निर्धारित खड्डयांची संख्या किती, आदी माहितीची नोंद करतील.भेटीसाठी निवडलेल्या जिल्ह्यातील ३६ शाळाजि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव, मारडा (मोठा), सिनाडा, ढोरवासा, मांगली, आमडी, नांदगाव पोडे, मालडोंगरी, ब्रह्मपुरी क्रं. ४, मारडा, आनंदवन, लिखितवाडा, भंगाराम तळोधी, धानोरा, पंचाळा, दिघोरी, घाटकुळ, मूल, ताडाळा, मुंळाडा, नलसेनी पेठगाव, व्याहाड खुर्द, सरडपार, मेंढामाल, सिंदेवाही नं. २, चिखलपरसोडी, मेंढामाल, मानली, आंबेनेरी, बोथली, उपरवाही, वनसळी, पिंपळगाव, पालडोह, शेणगाव, खिचल (बू.) आदी गावातील शाळांना संबंधित अधिकारी भेटी देणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद