लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले. ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल, अवेळी येणाऱ्या पावसामुळे नैसर्गिक वातावरण दिवसागणिक बिघडत आहे. वातावरणाचा समतोल निर्माण व्हावा व प्रत्येकाला जगण्यासाठी चांगले वातावरण मिळावे, यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करून वृक्ष जगविण्याची गरज आहे. राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्याची संकल्पना ना. मुनगंटीवार मांडली. या उपक्रमात जिल्हा परिषदने महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली. यावर्षी राज्यात ३३ कोटी वृक्षारोपणाचे काम पूर्ण करावयचे आहे. तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा महाराष्टÑ शासनाचा मानस आहे.वृक्षारोपणाची मोहीम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरूवारी वृक्ष दिंडीचा शुभारंभ केला जाणार आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदिंडीद्वारे गावात जागृती सभा घेण्यात येणार आहे. याशिवाय वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधल्या जाणार आहे. वृक्षदिंडीची सुरूवात जिल्हा परिषदपासून होईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही दिंडी पोहोचणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष भोंगळे यांनी दिली. यावेळी जि. प उपाध्यक्ष कृष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक श्रीकांत बळदे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.२०१८ मध्ये ९ लाख वृक्ष जगविले२०१६ मध्ये जिल्हा परिषदने २ लाख २६ हजार ५११ वृक्ष लावले होते. त्यापैकी १ लाख ३५२ वृक्ष जगविले. २०१७ मध्ये लावलेल्या ४ लाख ३४ हजार ६६८ वृृक्षांपैकी २ लाख ८० हजार ९९९ तर २०१८ वर्षात ९ लाख ८७ हजार ४५० वृक्षांपैकी ९ लाख १ हजार ८९० वृक्ष जगविण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सर्व विभागांना उद्दिष्टग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पाणी व स्वच्छता तसेच समाज कल्याण विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद लावणार ३४ लाख १६ हजार वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:15 PM
५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू