शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कृषी उद्योजकास १ कोटीच्या खंडणीची मागणी, सख्ख्या भावासह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:23 PM

गंगापूर तालुक्यातील घटना; आरोपींमध्ये फिर्यादीचा सख्खा भाऊ

गंगापूर: कृषी कंपनी व संचालकांची बदनामी थांबविण्यासाठी कंपनी मालकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये फिर्यादी उद्योजकाच्या सख्ख्या भावाचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार प्रताप वसंतराव सांळुके यांची मांजरी शिवारात दर्जेदार अग्रो सर्व्हिसेस लि. ही कंपनी असून त्यांची व कंपनीची बदनामी थांबविण्यासाठी आरोपी कल्याण साळुंके, राजेंद्र पवार, वाल्मिक सिरसाठ यांनी त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती तसेच पैसे दिले नाही तर कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल करु व सदरील कंपनी जमिनीसह बळकावण्याची धमकी तिघांनी आरोपींनी दिली होती; मात्र तक्रारदार प्रताप साळुंके यांनी आरोपींना समजावून सांगितले तरी त्यांनी न ऐकल्याने नाईलाजाने प्रताप साळुंके यांनी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये दिले. त्यानंतर देखील तिघांनी साळुंखे यांना वारंवार त्रास देऊन उर्वरित ९९ लाखांची मागणी केल्याचा आरोप प्रताप साळुंखे यांनी गंगापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी कल्याण साळुंके, राजेंद्र पवार, वाल्मिक सिरसाठ यांच्या विरोधात सोमवारी रात्री खंडणीसह विविध कलमांन्वये गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन भावांमध्ये अनेक दिवसांपासून वादगुन्ह्यातील तीन आरोपीपैकी एक कल्याण साळुंके हा फिर्यादी प्रताप साळुंखे यांचा सख्खा भाऊ आहे. त्यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू असून त्यातून कंपनीला केंद्रबिंदू करून दोन्ही भावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे शीतयुद्ध रंगले होते. त्यातच आता मोठ्या भावाने लहान भावावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद