अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण्यावर शासन काही मार्ग काढणार की नाही? हा प्रश्न पुढे आला आहे.चारवर्षापूर्वी उद्घाटन झालेल्या बाभळी बंधाºयात आजघडीला गेटजवळ दोन मीटर पाणी आहे. सध्या गोदावरीमध्ये येणारा पाण्याचा फ्लो थांबला आहे. त्यामुळे बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद केले तरीही पाण्याचा साठा होण्याची सुतराम शक्यता नाही. मागील तीन वर्षात अपुºया पर्जन्यमानामुळे तेलंगणात जादा प्रमाणात पाणी जावू शकले नव्हते. पण यंदा मात्र संपूर्ण मराठवाड्यात पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही मराठवाड्यातील धरणे पूर्णत: भरली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे.या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. हे संपूर्ण पाणी तेलंगणात पोहचले. बाभळी बंधाºयातून १ जुलै ते २८ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे.बाभळी बंधाºयास तत्कालीन आंध्र प्रदेशातील राजकीय नेत्यांसह सर्वांनीच कडाडून विरोध केला होता. या बंधाºयाचे प्रकरण न्यायालयातही पोहचले. आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्र आमच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला होता. हा युक्तीवाद खोडून काढताना तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधीनी बाभळी हे धरण नसून एक बंधारा असल्याचे नमुद केले होते. मान्सूननंतर वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी हा बंधारा उभारल्याचे सांगितले होते. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी आंध्र प्रदेशात जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. जललवादासमोर शेवटी आॅक्टोबर अखेरर्पंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातील, या बाबीला मान्यता देण्यात आली. त्यानुसारच आॅक्टोबर अखेर पर्यंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातात.मात्र बाभळी बंधारा प्रकरणात आता राज्यशासनाला नव्याने भूमिका मांडावी लागणार आहे. पाटबंधारे विभाग याबाबत शासनाला आवश्यक ती माहिती सातत्याने देत असली तरी राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न अडगळीलाच पडला आहे. याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे.पावसाळ्याचे प्रमाण वरचेवर कमी होत असून पाण्याच्या थेंबा-थेंबाचे महत्व आहे. जिल्ह्यात जलसाठवण क्षमता निर्माण झाल्यास वाहून जाणारे हजारो दलघमी पाणी साठवून ठेवले जावू शकते. मात्र आजघडीलाही आहे त्या योजनाही सुरू करण्यास शासन उदासिनता दाखवत आहे.धर्माबादसह उमरी, नायगाव तालुक्यातील काही पाणी पुरवठा योजनाही बाभळी बंधाºयावरील जलसाठ्यावर कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावीत आहेत.मात्र बाभळी बंधारा परिसरात आजघडीला जवळपास १२ लिफ्ट एरिगेशन प्रकल्प बंद पडले आहेत. त्या सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून नव्या योजना कार्यान्वित करण्याच्या अपेक्षा कशा बाळगाव्यात, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बाभळीतून १ हजार दलघमी पाणी तेलंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:23 AM