विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. अपुºया मनुष्यबळावर तग धरून असलेल्या या प्रयोगशाळेचे तब्बल १० कर्मचाºयांना नागपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या प्रयोगशाळेकडे वर्ग करण्यात आले आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व या विभागातील लोकप्रतिनिधींच्या अथक परिश्रमाने स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेला येनकेनप्रकारेण स्थापनेपासूनच नाट लागला आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.संपूर्ण राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत चालविल्या जाणाºया मुंबई आणि औरंगाबाद या दोनच ठिकाणी अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आता तिसरी प्रयोगशाळा नागपूर येथे स्थापन झाली आहे. या प्रयोगशाळेत भेसळयुक्त अन्न, बोगस सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या नमुन्याचे विश्लेषण केले जाते. सन २००० मध्ये औरंगाबादेत स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेसाठी विविध १११ पदांची मागणी होती; परंतु शासनाने अवघ्या ४८ पदांवर या प्रयोगशाळेची बोळवण केली, असे असले तरी मंजूर केलेली ४८ पदेदेखील आजपर्यंत कधीही पूर्णपणे भरण्याचे औदार्य शासनाने दाखविले नाही. परिणामी, जास्त दिवस पदे रिक्त राहिल्यामुळे मंजूर ४८ पैकी ७ पदे व्यपगत झाली. त्यामुळे ४१ पदांपैकी अवघी २९ पदे भरण्यात आली
औरंगाबादचे १० कर्मचारी पळविले नागपूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:21 AM