शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आठवडी बाजारात १० मोबाईल चोरीस

By admin | Published: June 02, 2014 12:28 AM

जालना : जुना जालन्यातील आठवडी बाजारात मोबाईल चोर अवतरले असून रविवारी दहा हॅण्डसेट चोरीस गेल्याची घटना घडली.

जालना : जुना जालन्यातील आठवडी बाजारात मोबाईल चोर अवतरले असून रविवारी दहा हॅण्डसेट चोरीस गेल्याची घटना घडली. यापैकी नऊ जणांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जालन्याचा आठवडी बाजाराचा दिवस म्हणून मंगळवार सर्वांना परिचित आहे. मात्र नजीकच्या काळात नवीन जालना भागात बुधवार व रविवारी जुना जालन्यात भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. गेल्या वर्षभरापासून मोबाईल चोरीच्या अनेक घटना या बाजारात घडल्या आहेत. पोलिस यंत्रणेसाठी हे मोठे आव्हान ठरल्यानंतरही चोरटे पोलिसांना भारी ठरले आहेत. पकडण्यात आलेल्या चोरट्यांवर कारवाई केल्यानंतरही पुन्हा दुसर्‍या आठवड्यात चोरीच्या घटना घडत आहेत. हे आव्हान पेलण्यास पोलिसांना अपयश आले आहे. जुना जालना भागातील आठवडी बाजार गांधी चमन ते रेल्वेस्थानक मार्गावर भरतो. सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत या मार्गावर प्रचंड गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे अनेक ग्राहकांचे मोबाईल चोरत आहेत. गर्दीमुळे धक्काबुक्कीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे मोबाईल चोरीस गेल्याचेही जाणवत नाही. त्यासाठी पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक वळविण्याची गरज आहे. वाहतूक वळविली जात असल्याची सवय लागली तर वाहनधारकच या मार्गावरून जाणार नाहीत. मात्र शहर वाहतूक शाखेला केवळ पुढाकार घेण्याची गरज आहे. शिवाय कदीम जालना व सदर बाजार पोलिस ठाण्याकडून बंदोबस्तही दिला जात नाही. (प्रतिनिधी)