औरंगाबाद : शहरात मागील आठवड्यात उसळलेल्या दंगल प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी आणखी दहा जणांना अटक केली. आजपर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ४५ झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीचा तपास एसआयटीकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दंगलीप्रकरणी आतापर्यंत १४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील काही गुन्हे पोलिसांनी तर काही गुन्हे मालमत्ताधारकांनी दाखल केले आहेत. दंगलीच्या शेकडो व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या क्लीप पोलिसांना प्राप्त झाल्या असून, या व्हिडिओ क्लीप आणि सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तसेच घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार, अटकेतील आरोपींच्या चौकशीअंती पोलिसांना रोज नवीन-नवीन आरोपींची ओळख पटत आहे. २४ तासांत पोलिसांनी दहा जणांना पकडल्याचे एसआयटीने सांगितले. फेरोज खानला लेबर कॉलनीतून तर सिकंदर खान यास अटक केली.>अटकेच्या भीतीने शेकडो तरुण गायबएसआयटीमध्ये २५ अधिकाऱ्यांसह सुमारे ५० कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही अधिकारी हे केवळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यातील दंगेखोरांची ओळख पटविण्याचे काम करीत आहेत. एसआयटीकडून अटकसत्र सुरू झाल्याचे कळताच दंगलीत प्रत्यक्ष सहभागी असलेले शेकडो तरुण बेपत्ता झाले आहेत. अनेक जणांनी त्यांचे मोबाईल बंद केले, तर काहींच्या घराला कुलूप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येऊ लागले आहे.
गुन्ह्यात आणखी १० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:32 AM