शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 8:08 PM

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे

छत्रपती संभाजीनगर : दसरा, दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सिकंदराबाद - नगरसोल - सिकंदराबाद विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

सिकंदराबाद -नगरसोल विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल. लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, रोटेगावमार्गे नगरसोल येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता पोहोचेल. तर नगरसोल ते सिकंदराबाद विशेष रेल्वे नगरसोल येथून १० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी रात्री १० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे शुक्रवारी सकाळी १०:५० वाजता पोहोचेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी