शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१०० कोटींच्या ठेवीही मोडण्याच्या हालचाली, सांगा स्मार्ट बस सेवा कशी चालेल? 

By मुजीब देवणीकर | Published: July 24, 2024 7:56 PM

शहर बससेवा तोट्यात चालते. हा तोटा भरून काढण्यासाठी अगोदर २०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीमार्फत पाच वर्षांपासून शहरात १०० बसेस सुरू आहेत. ही बससेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी १०० कोटींच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या. या ठेवी मोडल्यानंतर बससेवा कशा पद्धतीने चालेल, याचा आराखडा सादर करण्याचे आदेश सोमवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.

शहर बससेवा तोट्यात चालते. हा तोटा भरून काढण्यासाठी अगोदर २०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या. या ठेवींवरील व्याजाच्या रकमेतून तोटा भरून काढला जात होता. दोन वर्षांपूर्वी ठेवी मोडून १०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी वापरण्यात आले. आता १०० कोटी बँकेत होते. या ठेवीची मुदत जून महिन्यात संपली. शासकीय अनुदानाची रक्कम ठेवीच्या स्वरूपात न ठेवता ती वापरली पाहिजे, अशी भूमिका सोमवारच्या आढावा बैठकीत जी. श्रीकांत यांनी मांडली. १०० कोटींची रक्कम विकास कामांमध्ये वापरली तर बससेवा कशी चालेल, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. बससेवा सक्षमपणे चालावी, यासाठी आराखडा सादर करण्याचे आदेश त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिले.

३६ कोटींच्या बसेसस्मार्ट सिटीने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० डिझेल बसेस खरेदी केल्या. या बसेस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत. बसच्या तिकिटाचे दरही कमी आहेत. त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने या सेवेला प्राधान्य देतात.

दररोज २५ हजार प्रवासीशहरातील विविध मार्गांवर दररोज ९० बसेस धावतात. १० बसेस राखीव असतात. या बसेस ३०० पेक्षा अधिक फेऱ्या दिवसभरात पूर्ण करतात. २४ ते २५ हजार प्रवासी दररोज या सेवेचा लाभ घेतात.

तूट कशातून भागवणार? स्मार्ट सिटीची बससेवा दीर्घकाळ चालावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन अधिकाऱ्यांनी २०० कोटींच्या ठेवी बँकेत ठेवल्या. नंतर या ठेवी १०० कोटींवर आल्या. आता त्यासुद्धा मोडल्या जाणार आहेत. बससेवेत येणारी आर्थिक तूट कशी भरून निघेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

बससेवेचे मनपाकडे हस्तांतरणस्मार्ट सिटीने पाच वर्षे बससेवेचा प्रकल्प चालवून नंतर तो महापालिकेकडे हस्तांतरित करावा. हा प्रकल्प हस्तांतरित करताना काही भरघोस निधीही मनपाकडे वर्ग करावा, असे प्रारंभीच्या काळात ठरले होते. यासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका