लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने महापालिकेला मंजूर केलेल्या १०० कोटींच्या निविदांचे गुºहाळ अंतिम टप्प्यात पोहोचले असून, दोन दिवसांमध्ये निविदा महापालिकेच्या ई-टेंडरवर प्रकाशित होणार आहेत. कंत्राटदारांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा व्हावी, चांगल्या दर्जाचे कंत्राटदार या प्रक्रियेत सहभागी व्हावेत यादृष्टीने प्रशासनानेही कंबर कसली आहे. निविदेतील अटी व शर्ती अत्यंत पारदर्शक ठेवण्यात येणार आहेत. मागील अनुभव लक्षात घेऊन प्रशासन कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही.शासनाने तीन वर्षांपूर्वी महापालिकेला २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या मुद्यावरून चौकशी, न्यायालयात याचिका दाखल झाल्या. हा अनुभव लक्षात घेऊन १०० कोटींच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी राहील यादृष्टीने प्रशासन तेल ओतून काम करीत आहे. आयुक्त डी. एम. मुगळीकर स्वत: या प्रक्रियेत लक्ष घालून काम करून घेत आहेत. विशिष्ट कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदेतील अटी व शर्ती तयार करण्यात येतील, असा कयास शिवसेनेचा आहे. स्थायी समितीच्या बैठकीत आणि शनिवारी आयुक्तांकडे सेना पदाधिकाºयांनी अटी व शर्ती आम्हाला दाखवूनच अंतिम निविदा काढाव्यात, अशी मागणी केलीआहे.अतिवृष्टी, पालकमंत्र्यांचा पाहणी दौरा आदी व्यस्त कार्यक्रमांमुळे मनपा अधिकाºयांना मागील दोन ते तीन दिवसांमध्ये निविदांचे काम करण्यास वेळच मिळाला नाही. येणाºया ४८ तासांमध्ये निविदांच्या अटी व शर्ती अंतिम करण्यात येणार आहेत. बुधवारी किंवा गुरुवारी निविदा प्रकाशित होण्याची दाट शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निविदा प्रकाशित झाल्यावर त्याला प्रतिसाद कसा मिळतो, याकडे लागले आहे.
१०० कोटींच्या निविदा दोन दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:31 AM