श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, भर हिवाळ्यात टँकरने शंभरी गाठली आहे. ५० गावांत तब्बल ९५ हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ६ गावांची अजून मागणी आली आहे.जानेवारीअखेर टँकरची संख्या दीडशेच्या वर जाण्याची शक्यता आहे. मार्चअखेर ३०० टँकर लागल्यास आश्चर्य वाटू नये, एवढी भीषण दाहकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील केळगाव मध्यम प्रकल्प वगळता सर्वच मध्यम प्रकल्प कोरडे असल्याने कन्नड तालुक्यातून सिल्लोड तालुक्यासाठी पाणी आणावे लागत आहे.तालुक्यात एकूण १३१ गावे असून, यापैकी तब्बल ५० गावे टँकरवर अवलंबून आहेत. जानेवारीअखेर यात आणखी २० गावे वाढतील. शिवना, आमसरी, नाटवी, मादणी, पिंपळगाव पेठ, वांगी बु. या ६ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.यंदा पावसाने दगा दिल्याने खरिपाची पिके तर गेलीच, शिवाय हिवाळ्यातच पाणीटंचाईचा प्रश्न निर्णाण झाला आहे. तालुक्यातील मध्यम, लघु, साठवण प्रकल्पांसह विहिरी, नदी, नाले-कोरडे पडले आहेत. जानेवारीतच पाणीबाणी निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी पुढील सहा महिने प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.टँकर सुरू असलेली गावेतालुक्यातील मांडगाव, बाळापूर, डिग्रस, पानस, बोदवड, सराटी, बनकिन्होळा, धोत्रा, पालोदवाडी, बहुली, वरूड, आसडी, खुपटा, खातखेडा, पानवडोद खुर्द, वडोद चाथा, गव्हाली तांडा, निल्लोड, रहिमाबाद, पिंपळदरी, पिंप्री, लोणवाडी, गव्हाली, जळकी बाजार, उपळी, म्हसला बु., तलवाडा, धानोरा, देऊळगाव बाजार, पिरोळा डोईफोडा, बाभूळगाव, दीडगाव, केºहाळा, म्हसला खुर्द, पळशी, अनाड, भवन, बोरगाव कासारी, टाकळी जिवरग, ////////////मोढा बुर्द,//////// अंधारी, गेवराई सेमी, बोजगाव, रेलगाव, सोनाप्पावाडी, बोरगाव सारवणी, खेडी भायगाव, चिंचखेडा, वडाळा, जुना पानेवाडी या गावांना कन्नड व पिशोर येथील नेवपूर प्रकल्प, अंजना मध्यम प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर उंडणगाव, दहिगाव, पेंडगाव, चारनेर, मोढा खुर्द या ६ गावांसाठी १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.खेळणा प्रकल्प जोत्याखालीसिल्लोड तालुक्यात खेळणा व अजिंठा-अंधारी हे दोन मध्यम प्रकल्प, केळगाव, रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड, पेंडगाव-चारनेर, असे पाच लघु प्रकल्प, तर हळदा-जळकी साठवण तलाव, असे आठ प्रकल्प आहेत. यात रहिमाबाद, उंडणगाव, निल्लोड प्रकल्प कोरडे पडले असून, पेंडगाव- चारनेर, अजिंठा- अंधारी व खेळणा प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. हळदा- जळकी साठवण तलावात १३ टक्के व केळगाव लघु प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा आहे. यात खेळणा प्रकल्पावर सिल्लोड शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. खेळणा प्रकल्पही जोत्याखाली आला आहे.
सिल्लोड तालुक्यात टँकरने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:41 PM