शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

विद्यापीठातील ६२ पैकी फक्त ७ अभ्यासक्रमांना १०० टक्के प्रवेश

By राम शिनगारे | Published: August 07, 2024 4:48 PM

१३ अभ्यासक्रमांना एक आकडी संख्या तर २७ विभागांमध्ये ५० टक्क्याहून कमी प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ पैकी फक्त ७ पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाच १०० टक्के प्रवेश झाले आहेत. १३ अभ्यासक्रमांना १० टक्के पेक्षा कमी आणि २७ विभागांमध्ये ५० टक्क्यांहून कमी प्रवेश झाल्याची धक्कादायक आकडेवारी 'लोकमत'ला प्राप्त झाली आहे. स्पॉट प्रवेशाची फेरी पूर्ण झालेली असून, रिक्त जागांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यापीठासह धाराशिव येथील उपकेंद्रांमधील संपूर्ण अभ्यासक्रमांना सीईटीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी १५ मे पासून सुरू झालेली प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांनंतर पूर्ण झाली. २ ऑगस्ट रोजी स्पॉट ॲडमिशन व त्याच दिवशी नोंदणी करून ५ ऑगस्टपर्यंत प्रवेश करण्याचे नियोजन केले होते. पहिल्या फेरीनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांना फक्त ४१९ प्रवेशाची नोंद झाली होती. दुसऱ्या फेरीत हा आकडा ५०० च्या आसपास होता. स्पॉट ॲडमिशनमुळे ही संख्या १२१६ वर पोहचली. ६२ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उपलब्ध २ हजार १२१ जागांवर १ हजार २१६ प्रवेश झाले आहेत. त्याची टक्केवारी ५१.३० एवढी आहे.

१०० टक्के प्रवेश झालेले अभ्यासक्रमरसायनशास्त्र (७३), संगणकशास्त्र (४०), फाॅरेन्सिक सायन्स (४०), उर्दू (४०), विधि (६०), परफॉर्मिंग आर्ट (३०) आणि सोशल वर्क अभ्यासक्रमाला ६० प्रवेश झाले आहेत.

एक अंकी प्रवेश झालेले अभ्यासक्रमबायकेमिस्ट्री (४), इलेक्ट्रॉनिक्स (६), रुरल टेक्नॉलॉजी (३), बायोडायर्व्हसिटी (४), संख्याशास्त्र (९), इंडस्ट्रीयल ॲटोमेशन (६), महात्मा फुले व डॉ. बी.आर. आंबेडकर विचार (०), मास्टर ऑफ आर्ट (८), फाईड आर्ट इल्युस्टेशन (७), पेंटिंग (९), फाईन आर्ट बाय रिसर्च (९) आणि म्युझिक ८.

एकूण प्रवेशाची स्थितीउपलब्ध जागा : २१२१इच्छुक विद्यार्थी : २५२९प्रत्यक्ष प्रवेश : १२१६प्रवेशाची टक्केवारी : ५१.३०

विभागप्रमुखांना प्रवेशाचे अधिकारकाही जागा शिल्लक राहिल्या असतील तर त्या भरण्याची परवानगी व सर्वाधिकार विभागप्रमुखांनी दिलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल कोठे आहे? इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रतिसाद कसा आहे? याविषयी सर्वंकष माहिती घेऊन पुढील निर्णय घेता येऊ शकतील.- डॉ. वाल्मीक सरवदे, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण