शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसाहाय्य; ‘वयोश्री’ योजनेसाठी अर्ज केला का? कागदपत्रे काय लागतात?

By साहेबराव हिवराळे | Updated: July 24, 2024 20:15 IST

एकदमच घोषणांचा पाऊस झाल्याने ‘सेतू’वर कागदपत्रांसाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ३००० रुपये ज्येष्ठांना मिळणार असून, गेल्या सहा महिन्यांत १००० अर्ज वाटप झाले असून, आजपर्यंत २५ अर्ज भरून आले आहेत.

एकदमच घोषणांचा पाऊस झाल्याने ‘सेतू’वर कागदपत्रांसाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. वृद्धांच्या श्रवणयंत्र, काठी, फोल्डिंग चेअर व इतर साहित्य खरेदीसाठी बचत खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे.

काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना?

महाराष्ट्रातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी ही योजना अर्थसाहाय्याच्या स्वरूपात राबवली जात आहे. वयोमर्यादेमुळे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपक्रम खरेदी करण्याकरिता ही योजना आहे.

कोण आहे पात्र?महाराष्ट्रातील रहिवासी व वयाची ६५ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असावे. अर्जदाराकडे आधारकार्ड असावे किंवा आधार नोंदणी असावी. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड असावे.

काय लाभ मिळतो?वयोश्री योजनेंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना ३ हजार रुपये साधने खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत. या साधनांमध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर आदींचा समावेश आहे.

कागदपत्रे काय लागतात?योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज कोठे करायचा?वयोश्री योजनेच्या लाभासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, छत्रपती संभाजीनगर येथे अर्ज सादर करावेत.

२५ भरून आले...छत्रपती संभाजीनगरात १००० अर्जाचे वाटप करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या वतीने फक्त २५ अर्ज दाखल झाले आहेत. २५ ऑगस्ट ही अर्ज घेण्याची अखेरची मुदत आहे.- पी. जी. वाबळे, सहायक कल्याण आयुक्त

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकAurangabadऔरंगाबाद