औरंगाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १०४ शिक्षक-शिक्षिकांनी रक्तदान केले.
यावेळी रक्तदान करणारांमध्ये शिक्षिकांची संख्या मोठी होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित शिबिरात प्रमुख अतिथी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, विस्तार अधिकारी संगीता सावळे आदींच्या हस्ते पहिल्या पाच रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, राजेश भुसारी, रमेश जाधव, संजय बुचुडे, अनिल देशमुख, मच्छिंद्र शिंदे, मुश्ताक शेख, दत्तात्रय गायकवाड, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत, सुप्रिया सोसे, स्मिता वानेगावकर, शिल्पा निकम, सुजाता कवठेकर, शशिकला सोमवंशी आदींनी परिश्रम घेतले.