लोकमत न्यूज नेटवर्कभोकर/ किनवट/ अर्धापूर : येथील न्यायालयात आयोजित राष्टÑीय लोकअदालतमध्ये दिवाणी व फौजदारी अशी एकूण ११२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात भोकरमध्ये ५६, किनवटमध्ये ४२ आणि अर्धापूरमधील १७ प्रकरणांचा समावेश आहे.भोकरमध्ये ५६ लाख ५३ हजार वसूलभोकर: येथील जिल्हा सत्र न्यायालयात तालुका विधि सेवा समितीतर्फे लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाची एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन काही प्रकरणांत ५३ लाख ५३ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात मोटार अपघात क्लेम ११ प्रकरणांत ५१ लाख ७७ हजार रुपये वसूल करण्यात आले तर वीज वितरणच्या ६ प्रकरणांत वीजबिल न भरणे, वीजचोरी करणे अशा स्वरुपात २२ हजार १०७ रुपये, १३८ एन आय अॅक्ट चेक बाँन्स २ प्रकरणांत १ लाख ५० हजार रुपये असा एकूण ५३ लाख ५३ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करुन सामोपचाराने प्रकरणे निकाली निघाली. जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस.शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या लोकन्यायालयास न्या.डी.जी.कांबळे, न्या. पी. जी. महाळंकर, न्या. श्रीमती बी. ए. तळेकर यांच्यासह अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. उत्तम हाके, अॅड. गोविंदराव लामकाणीकर, अॅड. एस. एस.कुंटे, अॅड. शिवाजी कदम, अॅड. जे.जे.जाधव, अॅड. मिलिंद देशमुख, पो.नि.आर.एस. पडवळ, वरिष्ठ लिपिक व्ही. आर. जाधव व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.किनवटमध्ये उद्घाटनकिनवट: येथील लोकअदालतीचे उद्घाटन तालुका विधि सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्या. जी. आर. कोलते, सहदिवाणी न्या. जे. आर. पठाण यांच्या हस्ते झाले. राष्टÑीय लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, प्रिलिटीकेशन असे ४२ प्रकरणे तडजोड पद्धतीने मिटविण्यात आले. या लोकअदालतीसाठी दोन पॅनल होते. एका पॅनलवर प्रमुख म्हणून दिवाणी न्या. कोलते व दुसºया पॅनलवर सहदिवाणी न्या. पठाण यांनी काम पाहिले. पॅनल मेंबर म्हणून अॅड. कृष्णा राठोड, अॅड. टी. आर. चव्हाण, के. मूर्ती, व्ही. एम. शिंदे यांनी काम पाहिले.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजय चाडावार, सरकारी वकील शेवाळकर, अॅड. डी. जी. काळे, अॅड. टी. एच. कुरेशी, अॅड. अनंत वैद्य, अॅड. यशवंत गजभारे, अॅड. शंकर राठोड, अॅड. कोटावार, अॅड. गावंडे, अॅड. कोमरवार, अॅड. एस. व्ही. पवार, अॅड. नेम्माणीवार, अॅड. ताजणे, अॅड. आयतलवाड, अॅड. वाटोरे, एसबीआयचे दिलीप कोंडूरवार, चेतन उमरे, गुप्ता, बीएसएनएलचे पाटील, कारलेकर, अब्दुल मुजीब, म्यानावार, कुलकर्णी, चटलेवार, बोलेनवार, डगवाल, वाघमारे, भंडारे आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सुभाष बनसोड, उकंडराव राठोड, दोनकलवार, वेरुळकर, नीलवर्ण, जोंधळे आदींनी सहकार्य केले.
११२ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:30 AM