छत्रपती संभाजीनगर : शिवसेना गणेश मंडळाने मुलमची बाजारात १५० किलो बडीशेपचा वापर करून १२ फुटी गणपती साकारला आहे. मग, चला या बडीशेपच्या गणपतीचे दर्शन घेऊ या.
कुठेय मुलमची बाजार ?शहागंजातील गांधी चौक पुतळ्यापासून सिटीचौक पोलिस ठाण्याकडे जाताना सराफा रोडवर मोहन टॉकीज आहे. या टॉकीजच्या पाठीमागील गल्ली म्हणजे मुलमची बाजार.
लागले दोन महिनेमूर्तिकार आनंद जातेकर, गोविंद जातेकर व अमन कांचनकर यांनी ही मूर्ती तयार करण्यासाठी दोन महिने लागले.
काय, काय वापरले?यासाठी १२ फूट लांबीच्या बांबूचा गणपतीचा सांगाडा तयार केला. त्यावर ५० मीटर कापड व १० किलो डिंक लावून १५० किलो बडीशेप चिटकविली.
येथेही महादेवचबडीशेपमुळे मूर्तीला नैसर्गिक हिरवा रंग आला. हा सुंदर बाप्पा शिवलिंगाचा अभिषेक करताना दिसतो. यंदा गणेशोत्सवावर महादेवाचा प्रभाव येथेही दिसून येतो.
वेगळ्या संकल्पनेचे १३ वे वर्षआमचे गणेश मंडळ मागील १३ वर्षांपासून जरा हटके गणेशमूर्ती बनवते. याआधी नारळ, साबुदाणा, मक्याचे दाणे, तांदूळ तसेच कडधान्यापासून मूर्ती बनविली आहे. यंदा गणेश विसर्जन कायगाव टोका येथे गोदावरी नदीत करण्यात येईल.- सन्नी पारसवार, अध्यक्ष, शिवसेना गणेश मंडळ