छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिस विभागांच्या बदल्यानंतर अखेर शहरात १२ नवे पोलिस निरीक्षक रूजू झाले आहेत. त्यांच्यावर पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी ९ पोलिस ठाणे व तीन शाखांचा पदभार सोपवला. त्यात प्रामुख्याने सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी अतुल येरमे, तर क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी सुनील माने यांना नियुक्त करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबरला निवडणूक आयोगाने एका मतदारसंघात तीन वर्षे पूर्ण झालेले व स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यामुळे राज्य पोलिस विभागात अनेक संभ्रम निर्माण होऊन आक्षेप घेतले गेले. नुकतेच पोलिस महासंचालक कार्यालयाने बदल्या झालेल्यांपैकी ६० अधिकाऱ्यांच्या बदल्या करत त्यांना पुन्हा पूर्वीच्या जागी नियुक्त केले. त्यानंतर आता अंतिमत: १२ पोलिस निरीक्षक शहरात रूजू झाले आहेत.
अधिकारी - कुठून - कुठे (पोलिस ठाणे)गजानन कल्याणकर नागपूर शहर सायबरअशोक भंडारे नागपूर शहर वाहतूक विभाग (छावणी)सुनील माने पुणे शहर क्रांती चौकसुरज बंडगर पुणे शहर जवाहरनगरमंगेश जगताप पुणे शहर बेगमपुरासोमनाथ जाधव पुणे शहर उस्मानपुराराजेंद्र सहाणे पुणे शहर वाळूजजयंत राजुरकर पुणे शहर एम. वाळूज (दुय्यम निरीक्षक)दादासाहेब चुडप्पा पुणे शहर हायकोर्ट सुरक्षाअतुल येरमे मुंबई शहर सिडकोसंग्राम ताटे मुुंबई शहर मनपा अतिक्रमण विभागपवन चौधरी नाशिक शहर क्रांती चौक (दुय्यम निरीक्षक)