शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

औरंगाबाद जिल्ह्यात १२० टक्के पाऊस; १ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांवर अतिवृष्टीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 12:23 PM

Rain In Aurangabad : यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेसात हजार हेक्टरवरील पंचनामे २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पथक

- विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाख ६२ हजार ५३ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीने ( Heavy Rainfall in Aurangabad ) घाला घातला. ७ हजार ५७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून २२ हजार ४६ शेतकऱ्यांपर्यंत महसूलचे पथक पोहोचले आहे. २ लाख ८७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान केले आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक किती ठिकाणी नुकसान झाले, याच्या अंतिम अहवालावरच नुकसान भरपाई निश्चित होणार आहे.

सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होत असून मागील दोन वर्षांत ६०० कोटींच्या आसपास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर चार महिन्यांनी उशिरा ती मदत शेतकऱ्यांचा खात्यावर आली होती. यंदाही खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारीच्या अंतिम अहवालावरून नुकसानीचा अंदाज लावण्यात येणार आहे. अप्पर तहसील अंतर्गत २२ टक्के, औरंगाबाद तालुक्यात ६ टक्के, पैठण ३, वैजापूर ६, कन्नड ४, खुलताबाद ९, सिल्लोड २२ तर सोयगावमध्ये १६ टक्के पंचनामे झाले आहेत.

जिल्ह्यात १२० टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर १२० टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ९९ टक्के, पैठण १३८, गंगापूर ११२, वैजापूर १३४, कन्नड १४३, खुलताबाद ११८, सिल्लोड १४३, सोयगाव ११९ तर फुलंब्रीत ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पैठण, कन्नड, वैजापूर खुलताबाद भागात जास्त पाऊस झाला आहे.

नुकसानग्रस्त तालुक्यांचा आकडा असातालुका शेतकरी बाधित क्षेत्रअप्पर तहसील औरंगाबाद ४४२६- ३१०४ हेक्टरऔरंगाबाद ९८५१ - ६८९६ हेक्टरपैठण  ७५४३२ - ३२०२० हेक्टरफुलंब्री ०००० - ००००० हेक्टरवैजापूर ३६८७३ - १६०९९ हेक्टरगंगापूर ०००० - ००००० हेक्टरकन्नड ८१६०२ - ७८३११ हेक्टरखुल्ताबाद ३१६७२ - ११३४० हेक्टरसिल्लोड ४५७८५ - १३६४८ हेक्टरसोयगाव १८४५ - ६२३.५ हेक्टरएकूण २८७४८६ - १६२०५३ हेक्टर

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद