शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

सावधान! छत्रपती संभाजीनगरात १२२ कॅमेरे टिपताहेत तासाला ५०० बेशिस्त वाहनचालक

By सुमित डोळे | Published: January 30, 2024 1:16 PM

एआय पद्धतीने पाचव्या सेकंदाला मोबाइलवर दंड

छत्रपती संभाजीनगर : मान वाकडी करत मोबाइलवर बोलत जाणे, सर्रास उलट दिशेने जाणे, पोलिस दिसताच तिसऱ्याला उतरवून पुढे पुन्हा ट्रिपलसीट दुचाकी दामटणाऱ्यांच्या सर्व पळवाटा आता बंद होणार आहेत. शहरात महत्त्वाच्या १७ चौकांमध्ये तब्बल १२२ एनपीआर कॅमेरे अशा बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवतील. भविष्यात लवकरच शहरात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत बसवण्यात आलेल्या सर्व ८५५ कॅमेरे या एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नायझेशन) प्रणालीशी जोडण्यात येतील. विशेष म्हणजे, एका जंक्शनलाही प्रणाली प्रतितास ५०० बेशिस्त वाहनचालक कैद करत आहेत.

२६ जानेवारी रोजी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या ई-चालान प्रणालीला हा प्रयोग जोडण्यात आला आहे. ज्या चौकांमध्ये पोलिस उपस्थित नसतील, कमी प्रमाणात असतील, प्रामुख्याने तेथे या कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण करणे सुरू आहे. वाहतूक नियमनासोबतच अपघात करून पळून जाणारी वाहने, मंगळसूत्र चोरी, वाटमारी इ. गुन्ह्यांना देखील यामुळे आळा बसेल.

कशी काम करते एएनपीआर प्रणाली ?-ऑटोमॅटिक नंबर रिकग्नायझेशन आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन कॅमेरा, अशा दोन प्रकारच्या प्रणालींचा यात समावेश आहे.- पोलिस आयुक्तालय व मनपाच्या स्मार्ट सिटीच्या सीसीसी (कमांड कंट्रोल सेंटर) मध्ये याचे सर्व्हर कार्यरत असेल.-१७ जंक्शन (चौक) वर १२२ अद्ययावत कॅमेऱ्यांमध्ये ही प्रणाली संलग्न करण्यात आली आहे.-याद्वारे कॅमेरे सॉफ्टवेअरद्वारे वाहनाची नंबरप्लेट टिपून सर्व्हरला छायाचित्र, वाहनाच्या सर्व माहितीसह पाठवतात.

पाच कमांड, एआयद्वारे कॅमेरे तुम्हाला पकडणार-विनाहेल्मेट, सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपलसीट, उलट दिशेने (राँग साईड) जाणारी वाहने कैद करण्याची कमांड या साॅफ्टवेअरला देण्यात आल्या आहेत.-त्यानंतर एआय (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) द्वारे हे १२२ कॅमेरे आपोआप हे नियम मोडणाऱ्या वाहनांना कैद करतील. उदा. उलट दिशेने जाणाऱ्या दंडासाठी सदर चौकातील रस्ते, चौक, मार्ग, त्यांची दिशा व वाहनांची अपेक्षित दिशा अशा कमांडचा समावेश करण्यात आला आहे. एखादे वाहन उलट दिशेने जाताना दिसताच कॅमेरे आपोआप नंबर प्लेटसह छायाचित्र काढणार.

-असे तासाला एका जंक्शनवर तब्बल ५०० छायाचित्र हे कॅमेरे काढतात.-वाहनाच्या इत्यंभूत माहितीसह सीसीसीमध्ये छायाचित्र उपलब्ध होईल.-शेवटच्या टप्प्यात पोलिस दंड योग्य वाटल्यास केवळ एकदा क्लिक करतील.-पुढे ३ ते ५ सेकंदांत वाहनचालकाच्या आरटीओ नोंदणीकृत मोबाइलवर नोटीस प्राप्त होईल.

१३ मीटरपर्यंत नजर-साऊथ कोरिया कंपनी निर्मित अद्ययावत तंत्रज्ञयुक्त.-५ मेगापिक्सेल व नाईट व्हिजन कॅमेरे.-कुठल्याही वातावरणात सक्षमपणे कार्यरत राहतात.-सिग्नल च्या १३ मीटर अंतरावर कॅमेरे.

सीसीसीचे स्वरुप-पहिल्या टप्प्यात २० कर्मचारी या प्रणालीचे काम सांभाळतील.-यात सीसीसीचे ५ तर वाहतूकच्या ५ कर्मचाऱ्यांचा समावेश.-दोन शिफ्ट ते कार्यरत असतील.-कार्यालयीन वेळेत तेथूनच हे कर्मचारी माईकद्वारे अनाउंसमेंट करतील. जे ठराविक चाैकात वाहनचालकांना ऐकू जातील.-३ दिवसांमध्ये २७२ बेशिस्त दुचाकीचालकांना एनपीआरद्वारे दंड ठोठावण्यात आला आहे. यात राँग साईड, सिग्नल मोडणाऱ्या व ट्रिपलसीट वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे.

प्रणाली एक, फायदे अनेकप्रायोगिक तत्त्वावर ५ कमांडवरच सुरू असलेली चाचपणी यशस्वी ठरत आहे. मोठ्या चौकांमध्ये याचा अधिक उपयाेग होतो. उर्वरित कॅमेऱ्यांमध्ये या प्रणालीचा समावेशाचा विचार सुरू आहे.- शीलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी