शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

घाटी रुग्णालयातील १२३ कर्मचारी बेपत्ता ! कोणी सांगतील का, ते कुठेयत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 6:08 PM

कर्मचारी कागदोपत्रीच, प्रत्यक्षात गायब; परिचारिका संघटनेकडून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोजणी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात तब्बल १२३ कायमस्वरूपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी बेपत्ता आहेत. हे कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत असायला हवेत, तेथे ते नसतात. शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेने प्रत्येक वाॅर्डात जाऊन कर्मचाऱ्यांची मोजणी केली. त्यातून हा प्रकार समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे. हे कर्मचारी कुठे काम करीत आहेत, असा सवाल आहे, तर रुग्णालय प्रशासनाने असे काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नातेवाईकच स्ट्रेचर ओढतानाचे चित्र घाटीत रोजच पाहायला मिळते. स्ट्रेचर ओढण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. वॉर्डात पुरेसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणे गरजेचे आहे; परंतु तसे नसल्याने अस्वच्छतेसह रुग्ण, नातेवाइकांच्या रोषाला परिचारिकांना सामोरे जावे लागते. या सगळ्यामुळे परिचारिका कर्मचारी संघटनेने स्वत:च कर्मचाऱ्यांची मोजणी केली. तेव्हा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबर २७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही हिशोब लागला नाही.

काय आहे दावा ?परिचारिका संघटनेने ३ दिवस केलेल्या तपासणीत १२३ कर्मचारी आढळले नाहीत. ११३ कंत्राटी कर्मचारी आढळले; तर २७ कर्मचारी कार्यरत नव्हते. बेपत्ता कर्मचारी सुटीवरही नव्हते. ते फक्त कागदोपत्री दाखविले जात असल्याचा दावा संघटनेने केला.

प्रशासनाने कर्मचारी शोधावेतकायमस्वरूपी १२३ आणि २७ कंत्राटी कर्मचारी पाहणीत दिसले नाहीत. ते कुठे आहेत, त्यांचे वेतन कसे निघते, हे प्रशासनाने शोधले पाहिजे. प्रशासनाने आम्हाला यादी दिली; परंतु आमच्या आणि त्यांच्या यादीत तफावत आहे, असे शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात म्हणाल्या.

१२ कंत्राटी कर्मचाऱ्यांमागे एक मुकादम कशाला?घाटी रुग्णालयाने कंत्राटी कर्मचारी घेतले. १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांमागे एक मुकादम देण्यात आला आहे. हा मुकादम म्हणजे कंत्राटी कर्मचारीच आहे. त्यामुळे हे मुकादम फक्त हजेरी घेण्याचे काम करतात. परिणामी, कामासाठी कर्मचारी अपुरे पडतात. मुकादमाऐवजी या कर्मचाऱ्यांच्या हजेरीचे काम परिचारिकांना देणे शक्य आहे.- शुभमंगल भक्त, अध्यक्ष, शासकीय परिचारिका कर्मचारी संघटना

प्रशासनाला दाखवून द्यावेकर्मचारी कार्यरत नाही, असा कोणी आरोप करीत असतील तर ते त्यांनी प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांची पडताळणी केलेली आहे. जो आरोप केला जातो, तसे काही दिसत नाही.- डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर, प्रभारी अधिष्ठाता

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद