शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 20, 2024 19:06 IST

यंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून आतापर्यंत १,२३५ भाविकांनी बँकेत आपली नावनोंदणी केली आहे. याशिवाय हजारो लोकांनी ऑनलाइनही नोंदणी केली आहे. हे भाविक दररोज डोंगरावर चढण्याचा व उतरण्याचा सराव करीत आहेत.

यंदा ५२ दिवसांची अमरनाथ यात्रायंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे.

भाविकांना कुठे नोंदणी करावी लागते?अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी अमरनाथ श्राइन बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन फाॅर्म रजिस्ट्रेशन करता येते. तसेच याशिवाय या बोर्डाने जम्मू-काश्मीर बँकेलाही रजिस्ट्रेशनचे अधिकार दिले आहेत.

दोन पैकी एका मार्गाची करावी लागते निवडअमरनाथ यात्रेला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, त्यापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. शहरातील बँकेत १,२३५ भाविकांनी नावनोंदणी केली आहे. त्यात बालटान मार्गे ५५३ यात्रेकरू व पेहलगाम मार्गे ६८२ यात्रेकरू जाणार आहेत.

शहरातील १५ ग्रुप जातात दरवर्षी अमरनाथ यात्रेलाशहरातील १५ ग्रुप दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात. सुमारे १ हजार तरुण भाविक यात सहभागी होतात. यातील बहुतांश ग्रुप ऑनलाइन रजिस्ट्रेशन करतात. यात येथील गोविंदा पथकांचाही समावेश असतो. दरवर्षी नवीन सदस्य यात समावेश होत असतो. सोलापूर-धुळे महामार्गावरील गांधेली ते साताऱ्यापर्यंतच्या डोंगरावर किंवा तसेच गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, गणेश टेकडी या भागात चढणे व उतरण्याचा सराव केला जात आहे.

बाबा बर्फानी मित्र मंडळाचे यंदा २५वे वर्षकोरोना काळातील दोन वर्षे अमरनाथ यात्रा बंद होती. तो अपवाद वगळता शहरातील बाबा बर्फानी मित्रमंडळाने मागील २४ वर्षे अमरनाथ यात्रा यशस्वी पूर्ण केली. यंदा यात्रेला जाण्याचे २५वे वर्ष आहे. या मंडळात हातगाडीवाल्यापासून ते व्यापारी, उद्योजक, पोलिस उपनिरीक्षक, डॉक्टर, वकील, अशा २९ जणांचा समावेश आहे. ५ जुलैला मंडळ अमरनाथ यात्रेसाठी शहरातून रवाना होणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख रोशन पिपाडा यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmarnath Yatraअमरनाथ यात्रा