शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ऐतिहासिक मेहमूद व रोशन गेटच्या दुरूस्तीसाठी हवेत सव्वा कोटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 7:12 PM

मेहमूद गेटसाठी ७५ लाख तर रोशनगेटच्या डागडुजीसाठी ६० लाख रूपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

ठळक मुद्देजगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील ऐतिहासिक मेहमूद दरवाजातील लाकडी कवाड शुक्रवारी सकाळी निखळले.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील ऐतिहासिक मेहमूद दरवाजातील लाकडी कवाड शुक्रवारी सकाळी निखळले. या दरवाजाच्या डागडुजीसाठी शनिवारी मनपा आयुक्तांनी बैठक घेतली. बैठकीत इन्टॅकने डागडुजीचे अंदाजपत्रकच महापालिकेला सादर केले. ७५ लाख रूपये संपूर्ण गेटच्या डागडुजीसाठी लागणार आहेत. याशिवाय सर्वाधिक वाईट अवस्था असलेल्या रोशनगेटच्या डागडुजीसाठी ६० लाख रूपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी हेरिटेज कमिटीची बैठक झाली. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, स्नेहा बक्षी, दुलारी कुरेशी, वास्तुविशारद प्रदीप देशपांडे, महापालिकेचे उपअभियंता ए.बी. देशमुख यांची उपस्थिती होती. शहरातील प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल, यादृष्टीने प्लॅन तयार करणे, या प्लॅननुसार प्रत्येकाचा खर्च किती याचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी इन्टॅकवर सोपविण्यात आली. 

मेहमूद गेटसाठी ७५ लाख पाणचक्कीसमोरील गेटचा काही भाग निखळल्याने शुक्रवारी सकाळी इन्टॅकच्या सदस्यांनी त्वरित पाहणी केली होती. त्यानुसार गेटचे छत कोणत्याही क्षणी कोसळू शकते. गेटच्या आजूबाजूचे प्लास्टरही जीर्ण झाले आहे. गेटवर मोठ-मोठे झाडे उगवली आहेत. डागडुजीचे संपूर्ण काम व्यवस्थित करावे लागणार आहे. वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी ७५ लाख रूपये खर्च येईल, असे अंदाजपत्रकच महापालिकेला बैठकीत सादर केले. सागवानमध्ये प्रवेशद्वार बसविण्यासाठी खर्च जास्त येणार आहे. 

मेहमूद दरवाजावरील झाडे काढून केमिकलची फवारणी करावी लागणार आहे. दरवाजाचे आयुष्य वाढविण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता करणे आवश्यक आहे. लेबर कॉलनीतील रंगीन गेटप्रमाणे मेहमूद गेटच्या दोन्ही बाजूने सुंदर आयलॅन्ड तयार करावे लागेल, असेही देशपांडे यांनी नमूद केले. दरवाजा व पुलाचेही आयुष्य संपले असून, महापालिकेने याचेही काम सोबतच करायला हवे.

‘रोशन’साठी ६० लाखांचा खर्चऐतिहासिक रोशनगेटची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथील विजेची डी.पी. शिफ्ट करणे, चारही बाजूने लोखंडी ग्रिल बसविणे, दर्शनी भागात आकर्षक लायटिंग, पाण्याचे कारंजे उभारण्यासाठी किमान ६० लाख रूपये खर्च येईल, असेही हेरिटेजच्या बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद