शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

१३०५ शिक्षकांनी घेतली नाही लस, मुले शाळेत पाठवायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:02 AM

--- पालकांत चिंता : लसीकरणासाठी शिक्षक दिनाची डेडलाइन असताना शिक्षकांतून अनुत्सुकता का? सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह -- औरंगाबाद : शिक्षक ...

---

पालकांत चिंता : लसीकरणासाठी शिक्षक दिनाची डेडलाइन असताना शिक्षकांतून अनुत्सुकता का? सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

--

औरंगाबाद : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपूर्वी लसीकरण करून घेण्याची डेडलाइन देण्यात आली होती. तरी अद्याप जिल्ह्यात १३०५ शिक्षकांचे व १०६ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण बाकी आहे. शिक्षण विभागासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लसींचा मुबलक साठा उपलब्ध असताना अद्याप फ्रंटलाइन वर्कर म्हणून गौरवलेल्या शिक्षकांकडून लसीकरणाला प्रतिसाद न दिल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवायचे, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा सीईओंनी रविवारी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केली. प्रत्यक्षात लेखी आदेश सोमवारी देण्यात आला, तर आठवी ते बारावीचे वर्ग सध्या ग्रामीण भागातील ६५० शाळांहून अधिक गावांत भरत आहे. ग्रामीणमध्ये सध्या ५७ गावांत कोरोना संक्रमण असल्याने तेथील शाळा सुरू होणार नसल्या तरी इतर ठिकाणच्या शाळा सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून सुरू करण्याचे जिल्हा परिषद सीईओंचे आदेश आहेत. मात्र, लसीकरण, तपासणीकडे शिक्षकांची दिसणारी अनुत्सुकता विद्यार्थी आणि पालकांत संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. जिल्ह्यातील २९०६ पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये १७ हजार ३२२ शिक्षक आहेत. त्यापैकी दोन्ही डोस १२ हजार ८०५ शिक्षकांनी घेतले आहेत. केवळ पहिला डोस घेतलेल्या शिक्षकांची संख्या ३ हजार ९६१ आहे.

शिक्षकेतर कर्मचारी २११२ असून, १३५८ कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले असून, ६४८ जणांनी केवळ पहिला डोस घेतला आहे. १०६ शिक्षकेतर, तर १३०५ शिक्षकांचे लसीकरणही बाकी आहे. लस न घेणाऱ्यांचे प्रमाण ७.५० टक्के आहे.

---

जिल्ह्यातील एकूण शिक्षक -१७,३२२

पहिला डोस - ३,९६१

दुसरा डोस - १२,८०५

लस न घेतलेले - १,३०५

---

जिल्ह्यातील एकूण

शिक्षकेतर कर्मचारी - २,११२

--

पहिला डोस - ६४८

दुसरा डोस - १,३५८

लस न घेतलेले - १०६

---

कोणत्या तालुक्यात किती?

--

----- शिक्षक---------------------------------------- शिक्षकेतर कर्मचारी ---

तालुका - पहिला डोस घेतलेले - दुसरा डोस घेतलेले - डोस न घेतलेले - पहिला डोस घेतलेले - दुसरा डोस घेतलेले - डोस न घेतलेले

औरंगाबाद- ८८९- १९५३- २०१- १०४- १९६- ४४

गंगापूर- ९६३- १९५४- १८३- १७८- २५६- ५३

कन्नड- ३०८- १४१३- ७२- ५६- १६४- १८

खुलताबाद - १६०- ७५९- १६०- २४- ६६- १९

पैठण- ४८७- १७६४- २२९- १२०- १३७- ४२

फुलंब्री- २२१- १०४३- ८३- ४४- ८८- ३३

सिल्लोड- ५४५- १४१८- २९३- ५५- १६६- ५६

सोयगाव- ५१- ६५८- ३२- ८- ८३- ५

वैजापूर- ३३७- १८४२- १३७- ५८- २०२- ४०

------

मुबलक लस उपलब्ध

---

ज्या शिक्षकांचा पहिला आणि दुसरा डोस घ्यायचा राहिला आहे. त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी शिक्षण विभागासाठी मुबलक लसींचा साठा उपलब्ध करून दिला आहे. लसीकरण राहिलेल्या शिक्षकांनी तातडीने लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या असून, तोपर्यंत आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याला अडचण नसून कोरोना मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही आदेश मुख्याध्यापकांना दिले.

-डॉ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद