फुलंब्री : तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यात १३७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
फुलंब्री तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत फारसा प्रभाव दिसून आला नाही. पण दुसरी लाट तालुक्यात वेगाने पसरत आहे. गेल्या चार महिन्यांत ७०० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमिताची संख्या १२३२ झालेली आहे, तर ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला २२६ लोकांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांतच तालुक्यात १३७ रुग्ण वाढले आहेत. त्यात १५ एप्रिल-२१, १६ एप्रिल- ४२, १७ एप्रिल- ४३, १८ एप्रिल- ३१ या रुग्णांचा समावेश आहे, तर चार दिवसांत चार लोक कोरोनाने दगावले असून, यात शहरातील तिघांचा समावेश आहे.
कोट
फुलंब्री तालुक्यातील कोरोना संक्रमितांची संख्या अशीच वेगाने वाढत राहिली, तर बिल्डा येथील कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसांत ओव्हरफ्लो होईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
- डाॅ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी, फुलंब्री