औरंगाबाद : जिल्ह्यात १३९ बोगस डॉक्टर आढळले असून, त्यांना दोन दिवसांत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना आज आरोग्य समितीच्या बैठकीत दिले. बोगस डॉक्टर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दवाखाने थाटून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानुसार फुलंब्री तालुक्यात १२, खुलताबाद तालुक्यात २६, सोयगाव व औरंगाबाद तालुक्यात ५१, सिल्लोड तालुक्यात १, पैठण तालुक्यात ९, गंगापूर तालुक्यात १८, वैजापूर तालुक्यात १९ आणि कन्नड तालुक्यात ३ असे एकूण १३९ बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली. आज यासंबंधीचा विषय आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चेला आला. तेव्हा येत्या दोन दिवसांत या बोगस डॉक्टरांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुढील १५ दिवसांत तालुका आरोग्य अधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यांवर छापे टाकतील व त्यांच्याकडे आरोग्य विभाग आणि मुंबई नर्सिंग अॅक्टनुसार
जिल्ह्यात १३९ बोगस डॉक्टर
By admin | Published: July 14, 2015 12:36 AM