औरंगाबाद: शहरात पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच आहे. आज पहाटे १४ पीएफआय कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, शहरात अजूनही शहरात एनआयए, आयबी, एटीएस आणि शहर पोलीस यांची संयुक्त कारवाई सुरूच आहे.
मागील आठवड्यात देशभरातून पीएफआय या संस्थेच्या कार्यकर्त्यांना एनआयए आणि एटीएसच्या संयक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसच्या कोठडीतील पीएफआय कार्यकर्त्यांच्या माहितीवरून आता औरंगाबादमधून आणखी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस, एनआयए, आयबी आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने पहाटे २ ते ६ वाजेच्या दरम्यान केली. तब्बल १४ कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
आयबीचे पथक शहरातताब्यात घेण्यात आलेले १४ संशयितांना सिडको , सिटी चौक, क्रांती चौक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली येथून आयबीचे ८ जणांचे पथक शहरात दाखल झाले असून संशयितांची चौकशी सुरु आहे. पहाटे झालेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते अशी माहिती आहे.