शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 11:28 AM

दोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, तर दोन हजार मतदारांना मतदारसंघ किंवा वॉर्ड बदलून घ्यायचा आहे. ३७ हजार ७५९ नवमतदारांचे अर्ज आले आहेत.

निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, यात दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीस पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या ३७ हजार ७५९ जणांनी अर्ज दाखल केले असून, नावासह अन्य दुरुस्तीसाठी सहा हजारच्या वर मतदारांनी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमावर ५ डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तीच अंतिम मतदारयादी २०२२ मध्ये होणाऱ्या महानगरपलिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

नवीन मतदार होण्यासाठी किती जणांचे अर्जनवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ५५१ अर्ज कन्नडमधून झाले, तर सिल्लोडमधून तीन हजार ५२३, फुलंब्री तीन हजार ६५६, औरंगाबाद मध्यमधून तीन हजार २८२, औरंगाबाद पश्चिम तीन हजार ७६८, पूर्व एक हजार ८९१, पैठण पाच हजार ९४६, गंगापूर पाच हजार २७१, तर वैजापूरमधून तीन हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोणता फॉर्म कशासाठी :- फार्म ६ नुसार हे अर्ज आले आहेत. नवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ७ नुसार मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार १९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ नुसार नावासह दुरुस्तीसाठी सहा हजार २० अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ (अ)नुसार स्थलांतरबाबतचे दोन हजार १२ अर्ज प्राप्त आले आहेत. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबाद