औरंगाबाद : कोरोनाच्या नियमांचे पालन करीत औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आगारांमध्ये एसटीत १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी होत आहे. चालक, वाहक सोडले, तर जवळपास सर्वच उपस्थित राहत आहेत. आवश्यकतेनुसार येऊन कामकाज सुरू आहे. कोरोनाचा फटका फ्रंटलाईन वर्कर एसटीतील कर्मचारी वाहक, चालकांनाच अधिक बसला आहे.
१ हजार चालक आणि वाहकांची संख्या असून, जिल्ह्यात १७ अधिकारी आहेत. यांत्रिकी वर्गात ४०० आणि ३००च्या जवळपास प्रशासकीय अधिकारी, असा एकूण २७०० चा स्टाफ कार्यरत आहे. कोरोना महामारीमुळे त्रिसूत्रीचा अधिक वापर केला जात आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटाईझ हे प्रामुख्याने वापरले जात आहे.
प्रवाशांची गत लॉकडाऊनला जी अवस्था झाली, ती यंदा झालेली नाही. प्रशासनाने प्रवासी सेवा कोरोना नियमांचे पालन करून अवलंबली आहे. त्यामुळे एसटीतील चालक- वाहकांची आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती १५ ते २० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच आगारात वाहतूक नियम आणि कोरोना नियमांचे पालन केले जात असून, ठरवून दिलेल्या निममानुसारच कामावर यावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये एसटीतील कर्मचाऱ्यांनाच जास्त नुकसान झालेले आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जात आहे.
जिल्ह्यात एकून आगार - ८
- चालक -१०००
- वाहक - १०००
- अधिकारी - १७
- यांत्रिकी कर्मचारी - ४००
- प्रशासकीय अधिकारी मिळून सर्वच स्टाफ - २७००
- चालक-वाहक सोडले तर बाकी १०० टक्के
कोरोना काळात प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता, चालक व वाहकांना कामावर बोलविले जाते. बाकी तर १०० टक्के उपस्थिती अशीच ठराविक वेळेत येऊन हजेरी लावून जातात. कामाचा लोड आहे, परंतु चालक व वाहकांवर तो अधिक जाणवत आहे.
-
चालक, वाहकांच्या प्रतिक्रिया...
कोरोनाचा विळखा फ्रंटलाईनवर असणाऱ्या आमच्यासारख्या चालकांना अधिक जाणवत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे. कोण कसा आणि कुठून कोरोनाचा प्रसार करील, हे मात्र सांगता येत नाही.
- चालक (प्रतिक्रिया)
कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांना एसटीत बसविले जाते, परंतु प्रत्येक प्रवाशाचा संपर्क देखील येतो. अशा प्रसंगी संसर्गाला सामोरे जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात अनेकांना फटका बसला आहे.
- वाहक (प्रतिक्रिया)
एसटीत नियमानुसार १५ ते २० टक्क़ेच उपस्थिती ठेवण्यावर भर दिलेला आहे. ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन सर्वच आगारात केले जात आहे. अनेकदा सूचना देखील दिल्या जात आहेत. २७०० च्या जवळपास सर्वच स्टाफ असून, बारकाईने लक्ष ठेवत आहोत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रण, एसटी.