छत्रपती संभाजीनगर : आपल्या जिल्ह्यात पासपोर्टसाठी सेवा केंद्र सुरू झाले असून, छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांची गैरसोय दूर झालेली आहे. पासपोर्टसाठी अर्ज टाकण्यापासून ते दीड महिना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आणि त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता असल्यास अवघ्या १५ दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात मिळत आहे. त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना झालेला आहे.
पासपोर्टसाठी काय कागदपत्रे लागतील?पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, लाइट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे जोडली तरी पासपोर्ट काढण्यासाठी सोयीचे ठरते.
पत्त्याचा पुरावा काय चालतो?मतदान कार्ड तसेच आधारकार्ड आणि लाइट बिल, टेलिफोन बिल असा पुरावा म्हणून चालतो, तसेच ऑनलाइन फाॅर्म भरताना वेबसाइटवर तुम्हाला कागदत्रांची यादी येते, त्यानुसार अर्ज स्वत: भरावा कुणाच्या सांगण्यावरून नव्हे.
दिवसाला ८० अर्जांची पडताळणीछत्रपती संभाजीनगरात पोस्टाच्या पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ८० अर्जांची पडताळणी केली जाते. अधिक अर्ज पडताळणी केली जावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
मुलाखतीसाठी वेटिंगऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमच्या लिंक असलेल्या मोबाइलवर सध्या दीड महिन्याची वेटिंग असलेली तारीख येते.
१५ दिवसांत पासपोर्टपासपोर्टसाठी अर्जाची पडताळणी झाली की कागदपत्र पूर्ण असल्यास १५ दिवसांत पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येतो.
ऑनलाइन अर्ज बिनचूक स्वत:च भरावाऑनलाइन पासपोर्ट अर्ज भरण्याची सुविधा जिल्ह्यात असून नागरिकांंनी आपला अर्ज आपण स्वत:च भरावा त्यासाठी वेबसाइटवर सर्व सूचना दिलेल्या असतात, त्याचे पालन करावे.- पासपोर्ट कार्यालय अधिकारी