छत्रपती संभाजीनगर : महावितरण प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील लोकअदालत नुकतीच पार पडली. यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या व वीजचोरी या प्रकरणात १८७ ग्राहकांनी लोकअदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून १५ लाख २८ हजार ४६४ रुपयांचा भरणा केला.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेली ८८८१ प्रकरणे व वीजचोरीची ६७२ प्रकरणे अशी एकूण ९५५३ प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १३९ ग्राहकांनी ९,२५.४३५ रुपयांचा भरणा केला. तसेच वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये एकूण ६७२ दाव्यांमध्ये तडजोड करीत ४८ ग्राहकांनी ६ लाख ३ हजार २९ रुपयांचा भरणा केला. अशी एकूण १८७ प्रकरणे १५ लाख २८ हजार ४६४ रुपयांचा भरणा करून निकाली निघाली.
१५ टक्के सूट, अनेक फायदे...लोकअदालतमध्ये प्रकरण तडजोडीत निकाली निघाल्यास वीजचोरीच्या प्रकरणातील रकमेवर मूल्यांकनात १५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाल्याने शिक्षेतून सुटका, इतर खर्चाला फाटा देता येतो. विजेचा पुरवठा सुरळीत मिळू शकतो. असे अनेक फायदे लोकअदालतीतून देण्याचा महावितरणतर्फे प्रयत्न करण्यात आला.
लोकअदालतीत सहभागी झालेले ग्राहक व निकाली प्रकरणेपरिमंडळ -दाखल प्रकरणे -निकाली प्रकरण - रक्कम रुपयेछत्रपती संभाजीनगर - ४८३ -४६ -५,९६,६२९नांदेड -९,०५९ -१४१ -९,३१,८३५लातूर -११ -००० - ००००००मराठवाडा एकूण -९,५५३ - १८७ -१५,२८,४६४
लोकअदालतीसाठी यांनी घेतले परिश्रम...
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोळे, विधि अधिकारी, अधीक्षक अभियंता, व्यवस्थापक विवले, कनिष्ठ विधि अधिकारी, सहायक विधि अधिकारी आणि उपविधि अधिकारी यांच्यासह कार्यकारी अभियंते, अभियंते, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.