शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

१५ टक्के नेत्र रुग्णांना रस्त्यांवरील धुळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:17 AM

शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देडोळ्यांत खडीची कच : रुग्णालय गाठण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. वाहनचालकांच्या डोळ्यात खडीची कच जाण्याचा प्रकार होत आहे. परिणामी डोळे लाल,जळजळ होणे, सुजल्याने रुग्णालय गाठण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे.जालना रोड, महावीर चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यासह शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांना सध्या खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांमध्ये खडी, माती टाकून रस्त्यांची दुरवस्था झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु खड्डे बुजविण्यासाठी टाक लेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरून नागरिकांच्या डोळ्यांना दुखापत करण्यास कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे खडीचा बारीक कच हवेद्वारे दुचाकीचालक, पादचाºयांच्या डोळ्यात जाण्याचा प्रकार वाढत आहे.अनेक दुचाकीचालकांच्या हेल्मेटला काच नसते. तसेच गॉगल्सचाही वापर केला जात नाही. परिणामी डोळ्यात धुळीचे, खडीचे कण गेल्यानंतर भरधाव दुचाकी अचानक थांबविण्याचा प्रकार शहरातील रस्त्यांवर होत आहे. त्यातून अपघाताचाही धोका निर्माण होत आहे.बारीक खडीमुळे डोळे चोळले जातात. प्रचंड वेदनेने डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे,डोळे सुजण्याचा प्रकार होत आहे.नेत्र रुग्णालयात दररोज येणाºया एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्णांना असा त्रास होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.औषधाने आराम, रस्ते ‘जैसे थे’रुग्णांना औषधाने आराम मिळतो; परंतु रस्ते जैसे थे आहेत. त्यामुळे डोळ्यात पुन्हा धूळ जाण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे एकाच रुग्णाला वारंवार या त्रासाला सामोरे जावे लागते....धुळीमुळे डोळे लाल होणे,जळजळ होणे आदी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन येणाºया रुग्णांचे प्रमाण १५ टक्के आहे. कचºयाच्या परिस्थितीनेही डोळ्यांना संसर्ग होऊन डोळे येण्याचा प्रकार होतो. नागरिकांनी खबरदारी घेऊन दुचाकी चालविताना हेल्मेट, गॉगलचा वापर करण्यास प्राधान्य द्याव.- डॉ. सुनील कसबेकर, अध्यक्ष, औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषण