औरंगाबाद : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विभागाने सक्षमपणे काम केल्यास शहराला ३० टक्के फायदा होईल, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आज पत्रकारांना सांगितले.शहरातील पाणीपुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी मनपा आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. होलानी यांच्या पथकाची नेमणूक केली. या पथकाने मागील एक महिन्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या संबंधीचा अहवाल बुधवारी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला. या अहवालातील काही ठळक वैशिष्ट्ये आयुक्तांनी पत्रकारांना सांगितली. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी लिकेज आहेत. काही गावांना पाणी देण्यात आले आहे. या पाण्याचा ताळमेळ कुठेच नाही. १५ टक्के या जलवाहिन्यांवर गळती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याचे केबल, मोठे लिकेज बंद केल्यास शहराला ३० टक्केफायदा होईल. लवकरच होलानी यांची समिती शहरातील पाणीपुरवठ्याचा बारकाईने अभ्यास करून सूचना करणार आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १५ टक्के पाण्याची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:50 PM
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर फक्त २ टक्केगळती असणे अपेक्षित आहे.
ठळक मुद्देतज्ज्ञांचा अहवाल : गळती २ टक्क्यांवर आल्यास ३० टक्केफायदा