शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:26 PM

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत.

औरंगाबाद : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शहरातील आमदारांना १५० कोटींच्या कामांचा धनलाभ झाला असून, त्यांच्या बंडखोरीनंतर सुमारे ३० कोटींची कामे अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या कामांबाबत काय होईल, हे आताच सांगणे अवघड आहे. शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील आ. संजय शिरसाट यांना ५७ कोटींचा निधी शिंदे यांनी दिला. प्रदीप जैस्वाल यांना १५ कोटींचा निधी दिला. शहरातील विविध विकासकामांसाठी शिंदे यांनी मागील तीन वर्षांत सुमारे १५० कोटींचा निधी दिला. त्यातील सर्वाधिक ५७ कोटींची कामे एकट्या पश्चिम मतदारसंघात झाली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३० कोटींच्या कामांना खीळ बसू शकते.

नगरविकास खात्याने शहरातील लोकप्रतिनिधींना निधी दिल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आली. शिरसाट, जैस्वाल, भुमरे या तीन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ७३ कोटींचा निधी मंजूर केला. तसेच अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे यांना २७ कोटींचा निधी मंजूर केला. ११४ कोटींच्या निधीतील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आणखी ३० कोटींची कामे शिल्लक असल्याचे कळते. आता शिंदे यांच्याकडून नगरविकास खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली कामे अधांतरी राहण्याची चर्चा आहे. रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील निधीचा आकडा वेगळा आहे. तसेच खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण यांनाही मागणीनुसार काही प्रमाणात निधी मिळाला.

प्रशासकीय मान्यतेसाठी अधिकारी मुंबईलाजिल्ह्यातील कामांसाठी जलसंपदा, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी मंगळवारी मुंबईला रवाना झाले. जलसंपदा खात्याचे अध्यादेश निघाले असले तरी किती कामांना मंजुरी मिळते, हे या आठवड्यात समोर येईल.

पीडब्ल्यूडीला १५० कोटींच्या मान्यतापीडब्ल्यूडीच्या १५० कोटींच्या कामांना मार्चमध्येच मान्यता मिळाली आहे. उर्वरित कामांच्या मान्यता मागील पंधरवड्यात पूर्ण झाल्या आहेत. सध्या कुठल्याही मंजुरीसाठी प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ