शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

१५७ ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Published: March 20, 2016 11:43 PM

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़मुखेड तालुक्यात मागील दोन वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला पुढे जावे लागत असून जमिनीची पातळी खालावली आहे़ ग्रामीण भागात पुरवठा केले जाणारे अशुद्ध असल्याचे अनेकवेळा पुढे आले असतानाही ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे़ ग्रामीण भागात शौचालय व सार्वजनिक नाल्याची व्यवस्था नसल्याने घाण पाणी जमिनीत मुरते़ ग्रामीण भागातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसतात़ ती घाण पावसाळ्यात वाहून विहीर, तलाव, नदीत जाते आणि तोच पाणी शुद्ध न करता पुरवठा केला जातो़ गावातील सार्वजनिक विंधन विहीर, हातपंप व बोअरजवळच ग्रामस्थ धुणे धुतात़ जनावरांना पाणी पाजवून त्याच ठिकाणी पशूधन धुतले जाते़ तेच घाण पाणी जमिनीतून मुरून पुन्हा हातपंपाच्या द्वारे पिण्यास वापरण्यास घेतला जातो़ अशा पाण्याची अनुजैविक व रासायनिक तपासणी केली असता सदर पाणी दूषित असल्याचे सांगितले जाते; पण ग्रामस्थांना दुसरे शुद्ध पाणी मिळत नसल्याने मजबुरीने पाणी प्यावे लागते़ अशुद्ध पाणी सेवनाने अनेक रोग पछाडतात़केंद्र शासनाने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मागासक्षेत्र अनुदान योजनेत नांदेड जिल्ह्याची निवड केली होती़ या योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील ५८ गावांत जलशुद्धीकरण उपकरणे बसवण्यासाठी ८ जानेवारी १५ रोजी पंचायत समितीने परवानगी मागितली होती़ यापैकी ३३ गावांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी देत यासाठी लागणारा १ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता़ पण संबंधित ग्रामसेवकाने जलशुद्धीकरण सयंत्र बसवण्याच्या कामात हाती घेतली नाही़ यामुळे या योजनेचा निधी परत गेला़ ग्रामसेवक संबंधित अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ३३ गावांतील ग्रामस्थांना आजही अशुद्ध पाणी सेवन करावे लागत आहे़ यापूर्वी ८० गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले होते़ तीन महिन्यात आणखी ४६ गावांतील पाणी स्त्रोत आले आहे़स्थानिक प्रशासन व ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभारामुळे बंद पडलेली शुद्ध पेयजल योजना पुन्हा कार्यान्वित करून तालुक्यातील प्रत्येक गावात ही योजना राबवण्यणाची सुरुवात करावी यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जांबचे सरपंच बाळासाहेब पुंडे, तारदडवाडीचे सरपंच हणमंत नरोटे, सावरगाव वाडीचे सरपंच नारायण चमकुरे, खैरक्याचे सरपंच लक्ष्मण पाटील खैरकेकर, जुन्याचे सरपंच मारोती पाटील अमनर यांनी केले आहे़