औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्काराची यादी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार शनिवारी दुपारी जाहीर झाली. त्यामुळे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी कोण, ही शिक्षकांमधील उत्सुकता दुपारनंतर मावळली.
यंदा एकूण १७ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात ९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ५ शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी दुपारी १ वाजता तापडीया नाटयमंदीरात होणार आहे.हे पुरस्कार शासनाच्या पुरस्कार निवडीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांन्वये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख तसेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य यांच्या जिल्हा निवड समितीने केली. यामध्ये जिल्हाभरातून प्रस्ताव प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची शिफारस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली होती. शनिवारी त्यांच्या मान्यतेने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे
प्राथमिक शिक्षक :वर्षा बाबुराव देशमुख (केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा, औरंगाबाद), शिवाजी लक्ष्मण डुकरे (प्राथमिक शाळा भायगाव, वैजापूर), मनोजकुमार सुखदेव सरग (प्राथमिक शाळा शेवता, पैठण), भगवान गुलाबराव जगताप (प्राथमिक शाळा देवळाणा, कन्नड), सनी सुभाष गायकवाड (प्राथमिक शाळा गाजरमळा, गंगापूर), दादाराव नरसिंग सोनवणे (केंद्रीय प्राथमिक शाळा निल्लोड, सिल्लोड), सदाशिव अर्जुनराव बडक (प्राथमिक शाळा वाकोद, फुलंब्री), दत्तात्रय दिनकर मरळ (प्राथमिक शाळा धामणगाव, खुलताबाद), दीपक सुभाष महालपुरे (प्राथमिक शाळा पळाशी, सोयगाव),
माध्यमिक शिक्षक :विद्या रामभाऊ सोनगिरे (प्रशाला सातारा, औरंगाबाद), गणेश लक्ष्मणराव सुरवाडकर (प्रशाला शिवराई, वैजापूर), ताराचंद उत्तमराव हिवराळे (प्रशाला मुलांची पैठण, पैठण), ब्रम्हदेव मारुतीराव मुरकुटे (प्रशाला अंबेलोहळ, गंगापूर), देविदास पितांबर बाविस्कर (प्रशाला शिवना, सिल्लोड), धनराज वसंत चव्हाण (प्रशाला जातेगाव, फुलंब्री), प्रदीप धनराव सोनार (प्रशाला राजेराय टाकळी, खुलताबाद), तर जगन भागाजी खंडागळे (प्रशाला कन्या पैठण, पैठण) यांना विशेष शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या शिक्षकांना विशेष पुरस्कारयाशिवाय बापु सुकदेव बावीस्कर (प्राथमिक शाळा, दत्तवाडी, केंद्र - सोयगांव, ता.सोयगांव), शैलेष प्रभाकर जावळे ( प्राथमिक शाळा, बोरगांव, केंद्र- अंबेलोहळ, ता.गंगापूर.), नितीन दत्ताप्पा गबाले (केंद्रीय प्राथमिक शाळा, गारखेडा नं.१, ता. औरंगाबाद), मनोहर भास्कर लबडे (प्राथमिक शाळा,निमगांव,केंद्र - शिऊर, ता.वैजापूर), मुरलीधर पोपट लगड (प्राथमिक शाळा,आमसरी, केंद्र-शिवना, ता.सिल्लोड) या पाच शिक्षकांना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.