औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारी कोरोनाचे १,७०५ रुग्ण आढळले, तर ४७ बाधितांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात ४२३ रुग्णांची भर पडली. शिवाय जिल्ह्यातील १०, तर नगर, वाशिम, जालना येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि सात जणांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात तब्बल २९५ रुग्णांची भर पडली. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९0 रुग्ण आढळले. शिवाय दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा २४ वर पोहोचला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १९२ जणांना कोरोनाची लागण झाली़ शिवाय, ६ जणांचा मृत्यूही झाला. नांदेड जिल्ह्यातही एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला़, तर ३९६ बाधित रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्यातील ७० जणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. परभणी जिल्ह्यात ८३ रुग्णांची वाढ झाली असून ७ जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद + 423औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ४२३ कोरोनाबाधितांची भर पडली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या २७ हजार ७१२ झाली. ७९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेड + 396नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू असून ३९६ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बाधितांची संख्या १० हजार ७०९ झाली. तसेच २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर + 295लातूर : शुक्रवारी आणखी २९५ कोरोनाबाधितांची भर पडली. आता बाधितांची संख्या ११ हजार ६२९ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ८ हजार २७0 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीड + 156बीड : शुक्रवारी १५६ रुग्ण बाधित आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ६ हजार १८० झाली आहे. तसेच १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
हिंगोली + 90
हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ९0 रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला. आता मृत्यूंची संख्या २४ झाली आहे. तसेच बाधितांचा आकडा १ हजार ९९0 वर पोहोचला आहे. आतापर्यंत १ हजार ५६0 जणांनी कोरोनावर मात केली.
परभणी + 83परभणी: शुक्रवारी जिल्ह्यात ८३ कोरोनाबाधितांची भर पडली असून ७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ३ हजार ९५५ झाली. २ हजार ९०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना + 70जालना : शुक्रवारी जिल्ह्यातील ७० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. आता बाधितांची संख्या ६ हजार २४० झाली आहे. १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ५९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बीडमध्ये ७ जणांचा अंतबीड : जिल्ह्यात शुक्रवारी सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बाधितांची संख्या ६ हजार २४ झाली आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.