शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

औरंगाबादेत १८ शाळकरी मुलांना कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मनपाच्या शाळेतून घरी येणाºया १८ मुलांना मोकाट कुत्र्याने रहेमानिया कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ चावा घेऊन ...

ठळक मुद्देजखमी घाटीत दाखल : इंजेक्शन उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनपाच्या शाळेतून घरी येणाºया १८ मुलांना मोकाट कुत्र्याने रहेमानिया कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ चावा घेऊन गंभीर जखमी केले, तर दुसरी घटना चिकलठाणा येथे वानराने चार दिवसांपासून धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडविली आहे. चिकलठाणा येथे वानराने अनेक जण जखमी केल्याची घटना घडली आहे. वन विभाग त्यास पकडण्याचे प्रयत्न करीत असून, ते वानर हुलकावणी देत असल्याने अखेर शार्प शुटरला वन विभागाने पाचारण केले आहे.यशोधरा कॉलनी येथील मनपाची शाळा सुटल्यानंतर मुले सायंकाळी घरी जात असताना मोकाट कुत्र्याने शाळकरी मुलांवर हल्ला करून १८ मुलांना गंभीर जखमी केल्याचा थरार शुक्रवारी सायंकाळी घडला. सय्यद ऐहतीशाम सय्यद हाशम या मुलाच्या तोंडाला व गळ्याला या कुत्र्याने कडकडून चावा घेतला असून, त्याच्यासह अन्य मुलांनाही चावल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीला धावल्याने पुढील गंभीर अनर्थ टळला. महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्रे पकडण्याची गाडी शहरात फिरत असल्याचे अनेकांनी पाहिलेले नाही. मोकाट कुत्र्यांचा रात्रभर भुकण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक पहिलेच त्रस्त आहेत. त्यातही शाळेतून घरी येणाºया विद्यार्थ्यांवर पाण्याच्या टाकीजवळ कुत्र्याने हल्ला चढविल्याचा थरार सायंकाळी घडला.घाटीत इंजेक्शनउपलब्ध नाही...४जखमी मुलांना पालक घेऊन घाटीत उपचारार्थ दाखल झाले; परंतु घाटीत कुत्रा चावल्यानंतर द्यावयाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितल्याने पालकाची मोठी धावपळ झाली. रात्री उशिरापर्यंत ७ जखमींना घेऊन पालक घाटीत उपचारासाठी दाखल झाले होते. काही रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन गेल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.