शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

By विकास राऊत | Published: October 15, 2024 4:50 PM

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या संतनगरीकडे जातांना भाविकांनी दोन दशकांची परवड सहन केल्यानंतर त्या ४५ कि.मी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पुर्ण झाले नसून सात कि.मी.चे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळून कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी केल्याची चर्चा आहे.

डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे त्या मार्गाचे काम जेव्ही (ज्वॉइंट व्हेंचरशिप) मध्ये देण्यात आले होते. सेठी या कंत्राटदाराकडील ५ व मेहरा या कंत्राटदाराकडील सुमारे दोन कि.मी.चे काम रद्द करून मार्गाच्या कामाचा विषय एनएचएआयने थांबविला आहे. यामुळे कंत्राटदाराला लागणाऱ्या दंडातून सवलत मिळेल, शिवाय नव्याने कामाच्या निविदांचाही घाट घातला जाईल. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे सात कि.मी. अंतरात रस्त्याच्या कामाला स्काेप नसल्याचे कारण एनएचएआयने पुढे केले आहे. बिडकीन परिसरातील हे काम आहे. कामाच्या गुणवत्तेबाबतदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कंत्राटदाराचा दोन्ही बाजूंनी फायदा?सात कि.मी. काम कमी केल्यामुळे कंत्राटदारांनी मुदतीत काम पूर्ण करण्याचा व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा मुद्दा राहिलेला नाही. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम दिले होते. यातील जवळपास सर्वच रक्कम अदा केल्याची चर्चा आहे. काम कमी केल्यामुळे कंत्राटदाराचा तिथेही फायदा झाला आहे. सात कि.मी. कामासाठी एमजीपीच्या जलवाहिनीचे टाकण्याचे काम पूर्ण एनएचएआय नव्याने निविदा मागविणार आहे. तेवढ्या सात कि.मी.साठी महागड्या दराने निविदा येतील. त्यात होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असा प्रश्न आहे. दरम्यान, कंत्राटदार मुदतवाढीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.

प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांना थेट सवाल...प्रश्न : मार्गातील किती काम वगळले (डी-स्कोप) केले आहे.इंगोले : कंत्राटदार जेव्ही मध्ये असून, सात कि.मी.चे काम वगळले आहे.

प्रश्न : वगळलेल्या कामाची रक्कम किती आहे.?इंगोले : १७ कोटी रुपयांच्या आसपास असेल.

प्रश्न : काम वगळण्याचे मुख्य कारण काय आहे.?इंगोले : पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनीचे काम न झाल्यामुळे काम वगळले.

प्रश्न : कामाला काही मुदतवाढ दिली आहे काय ?.इंगोले : नाही, कामाला काहीही मुदतवाढ दिलेली नाही.

प्रश्न : जर काम वगळले आहे तर कंत्राटदाराला किती रक्कम दिली?इंगोले : याबाबत एनएचएआय वरिष्ठ कार्यालय निर्णय घेतात.

प्रश्न : कंत्राटदारावर मेहरबानी केली आहे काय?इंगोले : कंत्राटदार लवादात गेला असता, शासनाचे नुकसान झाले असते. मेहरबानीचा प्रश्नच नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhighwayमहामार्ग