सर्वाधिक सहा साखर कारखाने येथे सुरू झाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई, जयभवानी, माजलगाव, छत्रपती, जय महेश एनएसएल आणि येडेश्वरी शुगर या कारखान्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५ कारखाने सुरू झाले आहेत. संत एकनाथ, बारामती ॲग्रो, संभाजीराजे आणि घृष्णेश्वर या कारखान्यांचा यात समावेश आहे. १८ कारखान्यांनी आतापर्यंत दहा लाख टन उसाचे गाळप करून साडेसहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांना ६.६५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांपैकी केवळ संत मुक्ताबाई शुगर अँड एनर्जी हा एकमेव साखर कारखाना यंदा सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा आणि आदिवासी साखर कारखान्यामध्ये उसाचे गाळप सुरू झाले आहे.
18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू
By | Published: November 22, 2020 9:02 AM