संदीप शिंदे
हतनूर : कन्नड तालुक्यातील १.३९ टीएमसी क्षमतेचा शिवना टाकळी प्रकल्प जवळपास एका तपानंतर गेल्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर सद्यस्थितीत शिवना प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्यास शेतकऱ्यांना शिवना प्रकल्प दिलासा देणारा ठरेल.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तालुक्यातील अंबाडी, पूर्णा-नेवपूर, खारी खामगाव, अंजना-पळशी, गडदगड यासह अनेक लघुप्रकल्प तुडुंब भरले गेले. जून अखेर तालूक्यातील बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक झाले असून त्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या धरणातून शिवना टाकळी, वैसपूर, जळगाव घाट, हतनूर, टापरगाव, जैतापूर, अलापुर, अंतापूर, केसापूर, तांड पिंपळगाव, देभेगाव, बोरसर (खूर्द), बोरसर (बुद्रुक) या गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळतो.
मध्यम प्रकल्प
शिवना टाकळी : ७.०७. दलघमी. (१८टक्के)
अंबाडी : ०.४६ द.ल.घ.मी. (५ टक्के)
गडदगड : ०.२२ द.ल.घ.मी. (५ टक्के)
पूर्णा, नेवपूर : ०.१९ द.ल.घ.मी. (२ टक्के)
अंजना-पळशी: ६.२४ द.ल.घ.मी. (४५ टक्के)
----
लघु प्रकल्प
रिठ्ठी मोहर्डा : १ टक्के, कुंचखेडा ३ टक्के, चापानेर ३ टक्के, सिरजगाव ५७ टक्के, गणेशपूर २३ टक्के, वाघदरा १६ टक्के, आठेगाव, गौताळा, देवगाव रंगारी, खारी खामगाव, देवपुडी, औराळा, मुंगसापूर, वडोद, निभोरा, माटेगाव, आंबा, देवळणा, सांतकुड हे प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत.
,
300621\img_5724 copy.jpg
शिवना टाकळी प्रकल्पातील उरलेले पाणी