आतापर्यंत दहावीचे १.८० लाख तर
बारावीचे १.५१ लाख परिक्षा अर्ज
बोर्डाकडून परिक्षेची तयारी : राज्य मंडळाने जाणून घेतल्या विभागीय मंडळाच्या अडचणी
औरंगाबाद : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे विभागातील दहावीच्या १ लाख ८० हजार ६०१ तर बारावीच्या १ लाख ५१ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी ८ फेब्रुवारी पर्यंत परिक्षेसाठी अर्ज केले. अर्ज प्रक्रीया अद्याप सुरु असल्याने विद्यार्थीसंख्या आणखी वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आलेल्या अर्जांची संख्या अधिक असून त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून परिक्षेचे नियोजन सुरु असल्याची माहीती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
राज्य मंडळाने पुणे येथे विभागीय मंडळाच्या अधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत दरवेळी पेपर ११ वाजता सुरु होतो. नियोजित परिक्षेचा काळ हा कडक उन्हाळ्यात येत असल्याने ही वेळ कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर लवकर बोलवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. परिक्षार्थी बैठक व्यवस्था, प्रात्यक्षिक परिक्षा, कोरोना प्रतिबंधक तपासणीसाठी लागणार कालावधी, विभागीय मंडळाच्या अडचणींवर अधिकार्यांची मते जाणून घेण्यात आली. याविषयी राज्य मंडळाकडून राज्य शासनाकडे सर्व सुचना अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे जातील त्यानंतर वेळापत्रक व सुचना निश्चित निर्णय राज्य मंडळ विभागीय मंडळांना कळवण्यात आल्यावर त्याचे पालन विभागीय मंडळ करेल, असे पुन्ने म्हणाल्या.
७५ टक्के अभ्यासक्रम
नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा ७५ टक्के पाठ्यांशावर आधारीत होतील. तर पुनर्परीक्षार्थ्यांच्या १०० टक्के अभ्यासक्रमावर परिक्षा होतील. विभागीय मंडळाकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिकेचे काम पुर्ण झाले आहे.त्यामुळे आता त्यासंदर्भात निर्णय राज्य मंडळ घेईल, असेही पुन्ने यांनी सांगितले.