शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच

By सुमित डोळे | Updated: October 24, 2023 12:11 IST

मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोहोचले होते तपासाचे धागेदोरे, परंतु तपासात सातत्य राहिले नाही

छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात अमली पदार्थांच्या एकूण १५५ कारवायांत १८४ नशेखोर, अमली पदार्थांचे पुरवठादार पकडले गेले. यात जवळपास हजारो गोळ्या, नशेली पदार्थांच्या बाटल्या जप्त झाल्या. तरीही शहरातील नशेखोरीचा वेग दुपटीने वाढला. यात प्रामुख्याने एनडीपीएस पथक, पुंडलिकनगर, सिटीचौक, एटीएसच्या कारवाईत अमली पदार्थ सापडले. जुलै महिन्यातच मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोलिसांचे तपासाचे धागेदोरे पोहोचले होते. मात्र, त्यानंतर तपासात सातत्यच न राहिल्याने, गुन्हेगारांच्या साखळी पद्धतीच्या रॅकेटमुळे पोलिस शेवटपर्यंत पोहाेचू शकले नाही.

तीन वर्षांपूर्वी शहरातील वाढती नशेखोरी रोखण्यासाठी एनडीपीएस पथकाच्या स्थापनेनंतर कारवाया वेगाने वाढल्या. अमली पदार्थांपेक्षा नशेच्या गोळ्या, पातळ औषधांद्वारे नशा करण्याचे प्रमाण अधिक आहे. पावडर, कोकेन, चरसचा वापर उच्चभ्रू वसाहती, कुटुंबातील मुलांमध्ये सर्वाधिक आहे. पथकाने नशेच्या गोळ्या, खोकल्याच्या औषधांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे वर्तुळ अत्यंत गोपनीय पद्धतीने चालत असल्याने त्यांच्यापर्यंत ठोस पुराव्यांसह पोहोचण्यात पथकाला अडचणी आल्या.

नऊ महिन्यांत सर्वाधिक आरोपीवर्षे कारवाया आरोपी गांजा             नशेच्या गोळ्या औषधी बाटल्या पावडर चरस२०२२, ५८- ९९- १४९.५९९ कि.ग्रॅ- १३७६२- ३४५- ५.७३.०३ ग्रॅ. १९४.०६ ग्रॅ.२०२३ (सप्टेंबर) ५९- ८५-            ९३.८०२- कि.ग्रॅ १५४२- ५९९ - _             १४३.१२ ग्रॅ. 

जुलै महिन्यात मुंबईपर्यंत पाेहोचले पोलिसजुलै महिन्यात उच्चभ्रू कुटुंबातली मुले नशा करताना रंगेहात पकडली गेली होती. त्यात पुंडलिकनगर पोलिसांनी अनिल अंबादास माळवे (वय ५१, रा. प्रकाशनगर) याला एमडी ड्रग्ज व चरस, गांजासह अटक केली. माळवे हा पेडलर्सचा शहरातील मुख्य एजंट आहे. त्याच्या चौकशीत मुंबईच्या ग्रँट रोडवर मुख्य तस्करांना भेटून हे पदार्थ आणले जात असल्याचे सिद्ध झाले होते, तर त्याच आठवड्यात एटीएसच्या कारवाईत मोहम्मद अदनान शेख अशरफ (२७, रा. गणेश कॉलनी) हा ४ लाख ९३ हजार रुपयांच्या २४६.५० ग्रॅम चरससह पकडला गेला होता. अदनान, अनिलसह अन्य एजंटही व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर एकमेकांच्या संपर्कात राहतात. संपर्क होताच चॅट, कॉल हिस्टरी डिलिट करतात. दर दहा, पंधरा दिवसांनी रेल्वेद्वारे मुंबईवरून तस्करी होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी