छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १९ हजार ३८३ मनुष्यबळ लागणार आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात १६८०, कन्नड १७६०, फुलंब्री १७१५, छत्रपती संभाजीनगर मध्य १५४५, पश्चिम १७७०, पूर्व १४८०, पैठण १६३०, गंगापूर १६९०, तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात १६४० मिळून १४ हजार ९१० उपलब्ध मनुष्यबळ आहे.
जिल्ह्यात २८९८ हजार मतदान केंद्रेजिल्ह्यात २८९८ एकूण मतदान केंद्रे आहेत. सहायकारी मतदान केंद्रांचा आकडा ८४ असणार आहे. ८९८ केंद्रे जालना लोकसभा मतदारसंघात असतील. उर्वरित २ हजार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात असतील.
कोणत्या तालुक्यात किती मतदान केंद्रे?तालुका.................. मतदान केंद्रेसिल्लोड...................३२४कन्नड......................३४५फुलंब्री.....................३४२मध्य (छ.संभाजीनगर)..३०३पश्चिम (छ.संभाजीनगर)..३१६पैठण....................३२६गंगापूर...............३२८वैजापूर.................३२३एकूण...................२८९८
जिल्ह्यात १९ हजार ३८३ कर्मचारी लोकसभा निवडणुकीसाठी लागणार आहेत. ४ हजार ४७३ कर्मचारी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. १४ हजार ९१० कर्मचारी सध्या उपलब्ध आहेत.
मतदार यादी अद्ययावतीकरण...आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचे अद्ययावतीकरण झाले आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या २९ लाख ९३ हजार ४०३ वर गेली आहे. यामध्ये १ लाख २० हजार ६६० नवीन मतदारांची नोंदणी झाली. २३ जानेवारी २०२४ पर्यंतच्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५ लाख ७० हजार ७३९, स्त्री मतदार १४ लाख २२ हजार ५३१ व तृतीयपंथी मतदार १३३, अशी एकूण मतदारसंख्या २९ लाख ९३ हजार ४०३ आहे.
प्रशासनाची तयारी सुरूनिवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाची तयारी सुरू आहे. विविध पातळ्यांवरील काही प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत, तर काही शिबिरे होणे बाकी आहे. मतदान केंद्र व मनुष्यबळाची जुळवाजुळव काही प्रमाणात झाली आहे.-देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग